25.8 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeRatnagiriरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी ९ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी ९ उमेदवार रिंगणात

१३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ९ उमेदवारांनी एकूण १३ अर्ज दाखल केले. यामध्ये विनायक राऊत नावाचा आणखी एक अपक्ष उमेदवार असून, विद्यमान खासदार राऊत यांनी दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी (ता. २२) पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे; तर अर्जाची छाननी प्रक्रिया (ता. १९) होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या एका जागेसाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.

पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर १६ तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी ३ अर्ज दाखल केले. अमृत अनंत तांबडे यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला, तर आज अखेरच्या दिवशी सैनिक समाज पक्षाचे उमेदवार सुरेश गोविंदराव शिंदे यांनी एक अर्ज दाखल केला. विनायक राऊत यांच्या नावाशी मिळते जुळते नाव असलेल्या विनायक लवू राऊत यांनी अपक्ष म्हणून एक अर्ज दाखल केला. बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लहू आयरे यांनी एक अर्ज दाखल केला.

वंचित आघाडीचे मारुती रामचंद्र जोशी यांनी एक अर्ज दाखल केला. महायुतीचे उमेदवार नारायण तातू राणे यांनी शक्तिप्रदर्शन करत भाजपकडून २ उमेदवारी अर्ज दाखल केले. बहुजन मुक्त पार्टीचे उमेदवार अशोक गंगाराम पवार यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विनायक भाऊराव राऊत यांनी आणखी एक उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांनी १३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular