31.5 C
Ratnagiri
Sunday, January 19, 2025

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय ग्राहकहिताविरोधी – मोहन शर्मा

राज्यात स्मार्ट वीजमीटर बसवण्याचा घेतलेला निर्णय हा...

ठाकरे गटातील नाराजांशी सामंतांची गुप्त बैठक…

रत्नागिरीच्या राजकारणामध्ये लवकरच मोठी घडामोड होणार आहे....

मराठा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही : नारायण राणे

मराठा समाजाचा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही....
HomeRatnagiriकोकण किनारपट्टी भागात उन्हाचा चटका, उष्ण लाटेचा इशारा

कोकण किनारपट्टी भागात उन्हाचा चटका, उष्ण लाटेचा इशारा

कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा तसेच उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

मळभी वातावरणाचे सावट दूर झाल्यानंतर कोकण किनारपट्टी भागात उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील काही दिवस कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. या कालावधीत उन्हाचा ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी सागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आकाश निरभ्र होत झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. उन्हाचा चटका कायम असल्याने तापमानात वाढ झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा तसेच उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होऊन ते ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. पालघर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ७१ ते ८४ टक्के, तर रायगड व पालघर जिल्ह्यात ५२ टक्के आणि ठाणे जिल्ह्यात ४१ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ३० टक्के, तर रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यांत २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्य व वायव्येकडून राहील. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागातील ठाणे, रायगड सिंधदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण लाट, उष्ण व दमट हवामानाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर किनारी भागात असल्याने शहरातही तापमानवाढीचा वेग होता. त्यातच निवडणुकीची प्रचारसभा आणि माहोल असल्याने वाढत्या तापमानात पक्षाचे कायकर्ते आता घामाघूम होऊ लागले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular