31.4 C
Ratnagiri
Saturday, February 22, 2025

आजपासून आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी...

राजापुरात परवानगी नसतानाही उरूस साजरा, गुन्हा दाखल

शहरात मच्छीमार्केटलगत असलेल्या वास्तुत उरूस साजरा करण्यासाठी...

कांदळवन कार्यशाळेच्या खर्चाची चौकशी करा – पालकमंत्री उदय सामंत

कांदळवन व वनविभागाकडून नुकतेच एका आलिशान हॉटेलमध्ये...
HomeRatnagiriरत्नागिरीतील फणसवळे गावात घरफोडी १२ लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

रत्नागिरीतील फणसवळे गावात घरफोडी १२ लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

मंगळवारी सकाळी सर्वजण कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते.

फणसवळेत भुरटी चोरी करण्यासाठी आलेल्या भुरट्या चौराच्या हातात मोठे घबाड लागले. चोरट्याने १५ तोळे सोने आणि २९ हजार ५०० रूपयांची रोख रक्कम भरदिवसा घरफोडी करून लंपास केल्याची घटना फणसवळे कोंडवाडी येथे घडली आहे. रत्नगिरीत चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. आंब्याच्या बागेसह शेतात मजुरीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांची घरे हेरून आता घरफोडीसारखे प्रकार सुरू झाले आहेत. असाच एक प्रकार फणसवळे कोंडवाडी येथे घडला आहे.

सर्वजण घरातून बाहेर – पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरूप सोनू माने हे फणसवळे कोंडवाडी येथे राहतात. त्यांची पत्नी मनाली व मुलगा रोहन आणि त्यांची मुलगी असे एकत्र राहतात. मंगळवारी सकाळी सर्वजण कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. मुलगा एमआयडीसीत तर स्वरूप माने हे मजुरीसाठी गेले होते. तर त्यांची पत्नी शेतात कामाला गेली होती.

भर दुपारी घर फोडले – रस्त्यालगतच असलेले स्वरूप माने यांचे घर बंद होते. दुपारी १२.३० च्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या मागच्या बाजूने आतमध्ये प्रवेश केला. एका खोलीत कपाट उघडून हाती काही लागतंय का हे पाहण्यासाठी कपाट अस्तव्यस्त केले. मात्र त्या कपाटात त्याच्या हाती काहीच लागले नाही.

ट्रंक फोडला – स्वरूप यांच्या पत्नीने घरातील सर्व दागिने आणि मोलमजुरी करून कमावलेली पुंजी एका लोखंडी ट्रंकमध्ये दडवून ठेवली होती. या ट्रंकवर चोरट्याची नजर पडली. अज्ञात चोरट्याने घरातील कोयतीनेच ट्रंक फोडला. त्याचवेळी तेथे असलेली एक सुटकेसदेखील त्या चोरट्याने फोडली.

घबाडच मिळाले – फणसवळे गावात आजवर असा कधी प्रकार घडला नव्हता. कोणीतरी भुरटा असावा असे ग्रामस्थांचे म्हणणे असून भुरटी चोरी करण्यासाठी आलेल्या या चोरट्याच्या हाती घबाडच लागले. त्या ट्रंकमध्ये असलेले १५ तोळे सोन्याचे दागिने आणि २९ हजार ५०० रूपयांची रोख रक्कम चोरून नेली.

पत्नीला घाम फुटला – शेतात कामावर गेलेली स्वरूप यांची पत्नी मनाली ही दुपारी १ वा. च्या सुमारास घरी आली. यावेळी तिने त्या खोलीकडे पाहिले असता खोलीत सर्व कपडे अस्तव्यस्त पडल्याचे तिला पहायला मिळाले म्हणून तिने पुढे जाऊन पाहिले असता तिला घामच फुटला.

आरडाओरड सुरू – आपल्या घरात चोरी झालीय हे लक्षात आल्यानंतर मनाली हिने आरडाओरड सुरू केली, शेजारीपाजारी तिच्या आवाजाने हाने घराकडे धावत आले. साऱ्यांना हा प्रकार समजताच त्यांनी तात्काळ ग्रामीण पोलीसांना संपर्क साधला व घडल्या प्रकाराची माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी – फणसवळेत घरफोडी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून त्यांनी मनाली यांची फिर्याद घेतली. या फिर्यादीवरून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

RELATED ARTICLES

Most Popular