25.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriएसीमधील शॉर्टसर्किटने घराला आग मांडवी येथील घटना

एसीमधील शॉर्टसर्किटने घराला आग मांडवी येथील घटना

अग्निशमन दलाने अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

घरातील एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. शहरातील मांडवी येथे आज सकाळी ही घटना घडली. पहाटेच आग लागली होती; मात्र उशिरा समजल्यामुळे घरातील आतील भागाचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिक आणि पालिकेच्या व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने, घटनेवेळी घरातील खोलीत कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही; मात्र मोठे नुकसान झाले. खेडेकर यांचा मांडवी भैरी मंदिराच्या पुढच्या बाजूला बंगला आहे. बंगल्याच्या वरच्या खोलीमध्ये असलेल्या एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन पहाटे आग लागली; परंतु ते कोणाच्या लक्षात आले नाही. हळूहळू आग संपूर्ण खोलीत पसरली. धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते. घरातील वस्तू जळत होत्या.

त्यानंतर तत्काळ एमआयडीसी आणि रत्नागिरी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर पुन्हा पालिकेचा आणखी एक बंब मागविण्यात आला. सुमारे तीन बंबांद्वारे आळीपाळीने पाणी मारून हळूहळू आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. खोली बंद असल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत होते. खोलीत काही दिसत नव्हते. पाण्याचा मारा होईल, तशी आग आटोक्यात येत होती. आग आटोक्यात आल्यानंतर दोन्ही खोलीत पाहिले तर एसीसह संपूर्ण सामान जळून खाक झाले होते. इलेक्ट्रिक वायरही जळून गेल्या होत्या. या आगीत खेडेकर यांचे मोठे नुकसान झाले.

आग नियंत्रणासाठी यांनी केली मदत – स्थानिक माजी नगरसेवक बंटी कीर यांच्यासह अनेकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. एमआयडीसीच्या अग्निशमन दलाबरोबर रत्नागिरी पालिकेच्या अग्निशम दलाचे यशवंत शेलार, फायरमन, ड्रायव्हर, संदीप शिवलकर, सूरज पवार, रोहन घोसाळे, नार्वेकर आदींनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

Most Popular