27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeDapoliफत्तेगडावरील भिंत कोसळून दोन घरांचे नुकसान, संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

फत्तेगडावरील भिंत कोसळून दोन घरांचे नुकसान, संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

दोन घरांचे मिळून तीन लाख ६० हजारांचे नुकसान झाले.

गेले चार दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हर्णै-फत्तेगड किल्ल्यावरील पेडेकर यांच्या घराच्या मागील संरक्षक भिंत आणि किल्ल्याची तटबंदी कोसळल्यामुळे दोन घरांचे मिळून तीन लाख ६० हजारांचे नुकसान झाले. त्या घरातील १० जणांना तातडीने जवळच्या नातेवाइकांकडे स्थलांतरित केले आहे, अशी माहिती हर्णै सज्जाचे तलाठी अक्षय पाटील यांनी दिली. ऑगस्ट २०२० मध्ये या भिंतीचा काही भाग कोसळला होता. त्यावेळी तहसीलदार, ग्रामपंचायत यांना कळवले होते; परंतु अद्याप या भिंतींच्या बांधकामसंबंधी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. फत्तेगड येथे मारुती कृष्णा पेडेकर व लक्ष्मण पेडेकर यांचे घर आहे. यांच्या घराच्या मागील बाजूची फत्तेगड किल्ल्याची भिंत आणि या भिंतीला लागूनच सिमेंटचा बांधलेला बंधारा गुरुवारी (ता. २४) सकाळी कोसळला. त्यामुळे लक्ष्मण पेडेकर आणि मारुती पेडेकर यांच्या घरांचे तीन लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे. यामुळे लक्ष्मण यांच्या घरातील चार आणि मारुती यांच्या घरातील सहा जणांना तातडीने त्यांच्या फत्तेगडावरीलच नातेवाइकांकडे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. भविष्यात या दोघांच्याही घरांना मोठा धोका होण्याची दाट शक्यता आहे.

२०२० मध्येही कोसळली होती भिंत – ऑगस्ट २०२० मध्ये फत्तेगडावर भिंत कोसळून पेडेकर यांच्या घराच्या इमारतीला धक्का बसला होता. त्या घराला तडादेखील गेला होता. त्यावेळी तहसीलदार व ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तलाठी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी येऊन फक्त पाहणी केली. पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाच वर्षांनंतर पुन्हा गडावरील भिंत कोसळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दापोलीत घराशेजारील भिंत कोसळली – दापोली शहरातील फॅमिली माळ परिसरात कोंडविलकर यांच्या घराशेजारील संरक्षक भिंत कोसळली. यामुळे कोंडविलकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी सहाच्या सुमारास येथील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. घराला धोका निर्माण झाल्यामुळे त्यांनी स्थलांतर करण्याची तयारी दाखवली असून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular