अमली पदार्थांच्या विळख्यात चिपळूण सापडले असून, युवा पिढी त्याच्या आहारी गेली आहे. यात प्रामुख्याने महाविद्यालयीन, तर काही अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे. हा प्रकार गंभीर असताना पोलिस मात्र अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करत नाहीत. मुळातच अमली पदार्थांसह गांजासारखे नशा येणारे पदार्थ शहरात येतातच कसे, याची कल्पना या यंत्रणेला असणार. त्यांचे विक्रेत्यांशी लागेबांधे आहेत का, गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करताना हा गांजा कोठून आणला गेला, त्याच्या मुळाशी पोलिस जाताना दिसत नाहीत, अशी खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. शहरातील विरेश्वर तलाव परिसरातील एका इमारतीमध्ये चौघा तरुणांना गांजा सेवन करताना नागरिकांनी पकडून दिले.
शहरातील विरेश्वर तलाव परिसरातील एका इमारतीमध्ये चौघा तरुणांना गांजा सेवन करताना नागरिकांनी पकडून दिले. या घटनेनंतर अमली पदार्थ तालुक्यातून हद्दपार व्हावेत, यासाठी शुक्रवारी लोटिस्माच्या सभागृहात नागरिकांसह सामाजिक संस्थांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरासह जिल्ह्यात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या घटना वाढल्या तरी पोलिसांकडून असे पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई होत नाही. अशा पदार्थांची सर्रास विक्री होते; पण मुळातच अमली पदार्थ शहरात येतात कसे, असा सवाल करत बैठकीत पोलिसांच्या कारभारावर करण्यात आली. नाराजी व्यक्त अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेले चिपळूण बाहेर काढण्यासाठी आपणच चळवळ उभी केली पाहिजे.
पोलिसांच्या मदतीने आपण पोलिस मित्र म्हणून जिथे जिथे असे विक्री केंद्र आहेत, ती ठिकाणे पोलिसांना दाखवून कारवाई करण्यास भाग भाडू. शिवाय त्या ठिकाणी पुन्हा असा प्रकार होणार नाही, यासाठी आपण खबरदारी घेऊ. शाळा, महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी व्याख्याने आयोजित करायला हवीत, असे चर्चेतून ठरवण्यात आले. यावेळी शौकत मुकादम, सतीश खेडेकर, रामदास राणे, नितीन ठसाळे, मुबारक शहा, सतीश कदम, नाझीम अफवारे, शशिकांत मोदी, आशिष खातू, किशोर रेडीज, नीलेश कदम, रोहन चौधरी, श्रीनाथ खेडेकर, शाहनवाज शाह, मुराद अडरेकर, अदिती देशपांडे, रविना गुजर, रिहाना बिजले, रसिका देवळेकर, इनायत मुकादम, उदय ओतारी आदी उपस्थित होते.