देशात दीड वर्षापासून कोरोनाची भयावह परिस्थिती आहे. कोरोनापासून बचावासाठी सरकारकडून अनेक प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सोशल मिडिया, फोनवरुनही कॉलर ट्यूनच्या माध्यमातून देखील जनहितार्थ माहिती सादर केली जात आहे.
कोणत्याही नेटवर्क वर फोन लावल्यानंतर, कोरोना सुरु झाल्यापासून प्रथम कोरोनाची कॉलर ट्यून, लसीकरणाबाबतच्या माहितीची ट्यून ऐकू येत होती. सोनाराने कान टोचावे या उक्तीप्रमाणे, सर्वसामान्य व्यक्तीने सांगितल तर कदाचित आपण त्याकडे दुर्लक्ष केल असत, पण तेच कोणत्या तरी मोठ्या प्रसिद्ध स्टारने सांगितल कि, पचनी पडत तसेच घडण्यासाठी काही महिन्यापूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक कॉलर ट्यून अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सुरु करण्यात आली होती. पण कालांतराने ती हटवण्यात आली.
सुरुवातील सर्वांनी कोरोना काळामध्ये मोबाईलवर ती कोरोना कॉलर ट्यून ऐकली, पण नंतर त्याच ट्यूनबद्दल कंटाळा येऊ लागला. फोन कनेक्ट होण्याऐवजी, हे ऐकत राहणे नको वाटू लागले. त्यामुळे विविध नेटवर्कनी त्यावर काम करून ही कॉलर ट्यून बंद करण्याबाबत तोडगा काढला आहे.
बीएसएनएल प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्ससाठी कोरोना व्हायरस ट्यून मोबाईलवर बंद करण्यासाठी UNSUB टाईप करुन 56700 या किंवा 56799 वर मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येतो आणि ट्यून बंद होते.
एअरटेलवर 144 वर CANCT टाईप करुन मेसेज पाठवून कॉलर ट्यून बंद करता येईल. त्यानंतर मोबाईलवर एक मेसेजही येईल. त्याशिवाय, एखाद्याला फोन करताना नंबर डायल करावा लागेल. त्यानंतर कोरोना व्हायरस अलर्ट मेसेजची सुरुवात होईल, त्यावेळी १ प्रेस करावं लागेल. १ प्रेस केल्यानंतर कॉलर ट्यून बंद होईल आणि नॉर्मल ट्यून ऐकू येईल.
जिओ युजर्स आपल्या फोनवरुन 155223 वर STOP मेसेज करुन, कन्फर्मेशन नंतर कॉलर ट्यून बंद होईल. विविध नेटवर्कनी हि सुविधा विविध मार्गे सुरु केली आहे.