24.9 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraअखेर बारावीच्या विद्यार्थ्याचा निकाल पुढील आठवड्यात

अखेर बारावीच्या विद्यार्थ्याचा निकाल पुढील आठवड्यात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकालानुसार विषय निहाय गुण राज्य मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना ठराविक कालावधी नमूद करून दिला गेला होता. परंतु आत्ता वाढवून देण्यात आलेली मुदत संपली असून, आता विभागीय मंडळ व राज्य मंडळाकडून याची तपासणी  करुन ३१ जुलै पर्यंत अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

१४ ते २१ जुलै पर्यंत कॉलेजच्या प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यासाठी अशी मुदत दिली गेली होती. मुदत संपली तरी, त्यानंतरही काही कनिष्ठ महाविद्यालयांचे गुण नोंदविण्याचे काम शिल्लक राहिले असल्याने, त्यासाठी पुन्हा गुण नोंदविण्यासाठी २४ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी यावर माहिती दिली आहे की, देण्यात आलेली मुदत वाढ ही पुरेशी असल्याने, आता यानंतर हे गुण भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून, आता विद्यार्थ्यांच्या निकालांची पडताळणी करण्यात येणार असून त्यानंतरच निकाल घोषित केला जाणार आहे. त्यामुळे आधीच एकतर, कोरोनाचा संकटामुळे परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत आणि त्यानंतर निकालाला होणार विलंब, विद्यार्थ्यांना आणि पालकांना काळजीत टाकणारा आहे.

१०वी आणि १२वी म्हणजे शिक्षणाचा भविष्याकडे वाटचाल ठरवणारा मुख्य पाया, पण यंदाच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील आठवड्यात लागणाऱ्या निकालामुळे, नक्कीच सर्व विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये उत्साह वाढला असेल.

RELATED ARTICLES

Most Popular