26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriअसेही देशप्रेम, एस. टी. बसमध्ये सामूहिक राष्ट्रगीत म्हणत मानवंदना

असेही देशप्रेम, एस. टी. बसमध्ये सामूहिक राष्ट्रगीत म्हणत मानवंदना

अशीच एक अभिमानस्पद घटना लांजा ते ओणी या दरम्यान प्रवास करताना एस. टी. बसमध्ये घडली आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने संपूर्ण देशभर १५ ऑगस्ट अतिशय उत्साहात साजरा केला गेला. अनेक विभागांमार्फत विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यातील विशेष म्हणजे १३ ते १५ ऑगस्ट हर घर तिरंगा मोहीम सर्वसामान्यांना देखील सहभागी होता आले. प्रत्येक घरावर तिरंगा फडकताना पाहून ऊर भरून येत होता. पण केवळ स्वातंत्र्यदिनानिमित्तच देशप्रेम जागृत होऊन उपयोग नाही.

राज्याचे मुख्यमंत्री यांनी जिथे असाल तिथून ११ वाजता सामुहिक राष्ट्रगीत गायनामध्ये उभे राहून सहभागी होण्याचे आवाहन केले होते. अशीच एक अभिमानस्पद घटना लांजा ते ओणी या दरम्यान प्रवास करताना एस. टी. बसमध्ये घडली आहे. एका महिलेने अचानक बस थांबवली आणि गाडीतील प्रवासी त्या महिलेकडे बघतच राहिले. कोणाला काहीच कळेना! अचानक काय झाल. सारे बुचकळ्यात पडले. शेवटी या साऱ्याचा उलगडा झाल्यावर बस मधील प्रवाशांनाही त्या महिलेचा अभिमान वाटला.

काल बुधवारी सकाळच्या सुमारास रत्नागिरीहून राजापूरच्या दिशेने बस निघाली. या बसमध्ये रत्नागिरी मिरजोळे हनुमाननगर येथील श्रध्दा सुधाकर बेहेरे प्रवास करत होत्या. शासनाने काल सकाळी ११ वा. सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे निर्देश दिले होते. श्रध्दा बेहेरे यांच्या हे लक्षात आले. बसमध्ये चढल्यानंतर ११ वाजायला काही मिनिटे शिल्लक असताना त्यांनी एस. टी. बसच्या वाहक,चालकांना राष्ट्रगीत गायनासाठी दोन मिनिट बस थांबवण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीचा विचार करुन देशाबद्दल अभिमान जागवण्यासाठी सगळ्यानी या निर्णयाचे स्वागत केले. लांजा ते ओणी या दरम्यान ११ वा. एस. टी. बस थांबली. चालक, वाहक, प्रवाशांनी बसमध्येच उभे राहून जाग्यावरच सामूहिक राष्ट्रगीत म्हणत मानवंदना दिली .

RELATED ARTICLES

Most Popular