27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरमजान गोलंदाज आणि सहकार्यांना लेखी हमी मिळाल्यावर अखेर उपोषण मागे

रमजान गोलंदाज आणि सहकार्यांना लेखी हमी मिळाल्यावर अखेर उपोषण मागे

अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करून देखील हे खड्डे भरले गेले नाहीत, त्यामुळे शेवटी रमजान गोलंदाज यांना आमरण उपोषणाला बसावे लागले.

रमजान गोलंदाज आणि सहकार्यांनी राष्ट्रीय महामार्गवर पडलेल्या खड्याच्या विरोधात मागील दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरु केले होते. २२ सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले  होते. महामार्ग वरील खड्डे भरणे व महामार्ग वर पॅचिंग करणे अश्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु होते. मात्र दोन दिवसांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांच्या लेखी पत्रावरून १५ ऑक्टोबर पर्यत खड्डे भरणार आणि नोव्हेबर अखेर पर्यत पॅचिंग पूर्ण करून देणार असे आश्वासन देण्यात आल्याने रमजान गोलंदाज आणि सहकार्यांनी उपोषण थांबवले आहे.

राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाले असून महामार्गावर गाडी चालवणे कठीण बनले आहे. खड्डे एवढे मोठे मोठे पडले होते कि, असून संबंधित अधिकारी किंवा प्रशासनाची कोणतीच जबाबदारी शिल्लक राहिली नाही असे वर्तवले जात होते. अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करून देखील हे खड्डे भरले गेले नाहीत, त्यामुळे शेवटी रमजान गोलंदाज यांना आमरण उपोषणाला बसावे लागले.

गोलंदाज यांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री कार्यालयातून घेतली गेली आणि मग पुढील सूत्रे लगबगीने हलली, नाहीतर स्थानिक पातळीवर संबंधित कार्यालयाकडून कोणीही फिरकलेले नव्हते. प्राप्त झालेल्या लेखी पत्रामध्ये, उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग वरील खड्डे  १५ ऑक्टोबर तर पॅच नोव्हेंबर अखेर पर्यत भरणार असल्याचे नमूद केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांनी रमजान गोलंदाज यांना लेखी हमी पत्र दिले तेव्हाच रमजान गोलंदाज यांनी आपले उपोषण मागे घेतले. या उपोषणास तैमूर अलजी, दत्ता खातू,  अमित खातू,  वहाब दळवी, जमूरत अलजी, अनिरुद्ध कांबळे, धनाजी भांगे, मुझम्मील काझी, अझर गोलंदाज, हासीर हमदरे, संतोष देवळेकर, मुक्त्यार काझी, दिलदार कापडी, इम्तियाज कापडी आदिंचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

Most Popular