28.1 C
Ratnagiri
Sunday, August 10, 2025

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र – सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गणेशउत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात...

सिंधुदुर्गात पुन्हा ‘लम्पी’चा प्रकोप…

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पशुपालकांचे कंबरडे मोडलेल्या 'लम्पी...

समुद्र शांत झाल्याने मच्छीमार आनंदात…

वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही...
HomeEntertainmentलॉरेन्स बिश्नोईला मी इतर लोकांप्रामाणेच ओळखतो, सलमानचा जबाब

लॉरेन्स बिश्नोईला मी इतर लोकांप्रामाणेच ओळखतो, सलमानचा जबाब

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ५ जून रोजी धमकीचं पत्र मिळालं होतं.

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ५ जून रोजी धमकीचं पत्र मिळालं होतं. ‘सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू’, अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची एक टिम तात्काळ दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. सलमान स्वत: घराबाहेर येऊन क्राइम ब्राँचच्या टिमला सहकार्य करताना दिसला. आता याप्रकरणी त्याने जबाब नोंदवल्याचे समोर आलं आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या सलमान खानला मिळालेल्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. सलमानला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. सलमान खानला धमकीचं पत्र पाठवणाऱ्यांचा पोलीस तपास करत आहेत. असं असताना आता सलमान खानचा याप्रकरणी पहिल्यांदा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवल्याचे आल्याचे  समोर  आलं आहे. याप्रकरणाशी काही संबंधित प्रश्न त्याला विचारण्यात आले.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  अलीकडच्या काळात  कोणता थ्रेट कॉल किंवा मेसेज आला आला असल्याबद्दल यावेळी सलमानला विचारण्यात आलं शिवाय कोणाशी याकाळात वाद झाला आहे की याबद्दल देखील त्याला विचारण्यात आलं. यावर सलमाना खान देखील सांगितल की, मला कोणाताही थ्रेट कॉल किंवा मेसेज आला नव्हता किंवा माझे कोणाशी भांडणही झालेले नाही.

याशिवाय सलमानला गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या गॅंगकडून कोणती धमकी आल्याचे विचारण्यात आले. मी गोल्डी बरारला ओळखत नसल्याचे सांगत सलमान खानने यावेळी सांगितले. तसेच लॉरेन्स बिश्नोईला मी इतर लोकांप्रामाणेच ओळखतो तेही काही वर्षापूर्वी झालेल्या एका प्रकरणामुळे,  असं देखील सलमान खानने यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular