साखरपा वन तपासणी नाक्यावर रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास आटपाडी जिल्हा सांगली एस टी डेपो ची माल वाहतूक गाडी एम.एच.१४ बीटी ०६२६ मध्ये इंजायली जातीचा कापीव माल मौजे तुळसणी ता संगमेश्वर येथुन कोल्हापूर गोकुळ शिरगाव येथे विना परवाना वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सुरज तेली वनरक्षक साखरपा नाका यांनी त्या गाडीचा पाठलाग करुन मालवाहतूक गाडी पकडली. खात्री केली असता कापीव लाकुड माल असल्याने चालक इराण्णा सतीश इंडे वय ३४ याच्याकडे वन विभागाचा वाहतूक परवाना आहे का, या बाबत चौकशी केली असता वाहतूक परवाना नसल्याने चालकावर गुन्हा नोंद केला असून पुढील चौकशी करता चालक व मालवाहतूक गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.
वनखात्याने दिलेल्या माहितीनुसार गाडीमध्ये ४०० घनफूट लाकूड होते. हे लाकूड तुळसणी येथील मुकादम मिल येथून गोकुळ शिरगाव येथे जाणार होते. हा माल मुकेश पटेल रा. सरुड, ता. शाहूवाडी, कोल्हापूर यांच्या मालकीचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा प्रकार उघडकीस आल्यामुळे आता यामागे असलेल्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुरज तेली, नानू गावडे, सागर गोसावी, संजय रणधीर यांनी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख वनपाल तौफिक मुल्ला करत आहेत.
या गुन्हे कामी मा दिपक खाडे विभागीय वनाधिकारी चिपळूण सचिन निलख सहायक वनसंरक्षक चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज तेली वनरक्षक तपासणी नाका साखरपा व वनरक्षक नानू गावडे,सागर गोसावी, संजय रणधीर यांनी कारवाई केली असून पुढील तपास तौफिक मुल्ला वनपाल देवरुख करत आहेत तसेच अशा प्रकारची विनापरवाना लाकुड वाहतूक होत असेल तर वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर किंवा नजीकच्या वन विभागाच्या कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन वनविभाग तर्फे प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रादेशिक यांनी केले आहे.