राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात होणारी परप्रांतीय हायस्पीड बोटींची घुसखोरी, पर्ससीन व एलईडीच्या बेकायदेशीर मासेमारीला रोख लावण्यासाठी शासनाने अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्याने हवाई गस्त सुरू केली आहे; परंतु या कॅमेऱ्याला नाईट व्हिजन नसल्याने रात्री गस्तीला मर्यादा येत आहेत. त्याचा फायदा घेत बेकायदेशीर एलईडी आणि पर्ससीन मासेमारी केली जात असल्याचा दावा पारंपरिक मच्छीमार करत आहेत. गेले महिनाभरात एलईडी मासेमारी करणाऱ्या १० नौकांवर मत्स्यविभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे; मात्र मच्छीमारांचे रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या बेकायदेशीर मासेमारीचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मत्स्यविभागाला मिळते. यामुळे बेकायदेशीर मासेमारीला चांगलाच लगाम बसला. मत्स्यविभाग व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी बेकायदेशीर मासेमारीला चाप लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. येत्या काही वर्षांमध्ये मत्स्य उत्पादनवाढीच्यादृष्टीने मत्स्यविभागाला सक्त ताकीद दिली आहे.
ड्रोन कॅमेऱ्याने बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या १५ नौकांवर कारवाई केली आहे. मत्स्यविभागाच्या गस्तीने महिन्यात १० नौकांवर कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी दापोली भागात बेकायदेशीर एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या रायगडच्या नौकेला पकडण्यात आले. मालकाला ५ लाखांचा दंड केला. मत्स्यविभाग बेकायदेशीर मासेमारीला प्रतिबंध घालण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत; परंतु ते अपुरे पडताना दिसत आहे. जिल्ह्याच्या किनाऱ्यावर दोन ड्रोनद्वारे हवाई गस्त सुरू आहे; परंतु या कॅमेऱ्यांना नाईट व्हिजन नाही, हिटसेन्सिटिव्हिटी असल्याने माणसं दिसतात; परंतु नौकेची कोणतीही माहिती मिळत नसल्याची पडती बाजू आहे. याचा फायदा उठवत काही मच्छीमार रात्रीची बेकायदेशीर मासेमारी करत असल्याचे पारंपरिक मच्छीमारांचे म्हणणे आहे. रात्रीच्या बेकायदेशीर मासेमारीवर मत्स्यविभाग काय उपाय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
…. असे होईल ड्रोन ऑपरेशन – ड्रोनद्वारे दिवसाला ३० नॉटिकल म्हणजेच सुमारे ५५ किलोमीटरइतके अंतर एका झेपेत उभ्या, आडव्या, तिरक्या (व्हर्टिकल, हॉरिझंटल, झिगझंग, झेड, एस पॅटर्न) मध्ये उड्डाण घेतो. एका हवाई झेपेत असे ड्रोनद्वारे दिवसाला १२० नॉटिकल मैल म्हणजेच २२० किलोमीटर एवढ्या सागरी परिसरात गस्त घालू शकतो. ड्रोनची बॅटरीची क्षमता कमीतकमी दोन तास. दिवसाला किमान ६ तास एवढा वेळ ड्रोनद्वारे गस्त घालता येते. याचा वेग किमान ३० नॉटिकल मैल म्हणजेच ५५ किलोमीटर प्रतितास. वाऱ्याचा वेग ३० किलोमीटर प्रतितास सहन करण्याची क्षमता. याचे नियंत्रण कक्ष मत्स्यविभागाकडे आहे. त्यामुळे बेकायदेशीर मासेमारी नौका ड्रोनच्या टप्प्यात आली की, तिच्या नंबरसर अन्य माहिती मत्स्यविभागाला मिळते.