26.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriअवैध मच्छीमारी खपवून घेतली जाणार नाही - ना. नितेश राणे

अवैध मच्छीमारी खपवून घेतली जाणार नाही – ना. नितेश राणे

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री राणे हे १३ जानेवारीला रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत.

रत्नागिरी किनारपट्टीवर गत दोन दिवस झालेल्या कार्यवाहीची गंभीर दखल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. संबंधित नौका मालकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कोणत्याही पद्धतीत पारंपरिक मच्छीम ारांवर गदा येईल अशा पद्धतीने अवैध मच्छीमारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री राणे हे १३ जानेवारीला रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृहात विविध विभागांची बैठक आयोजित केली असून दरम्यान मत्स्यव्यवसाय / बंदरे या बाबींवर चर्चा होणार आहे. बैठकीस पोलीस विभाग, बंदर विभाग, कस्टम विभाग, भारतीय तटरक्षक दल, मत्स्यव्यवसाय विभाग आदी यंत्रणांचा सहभाग असेल.. तीन दिवसांपूर्वी रत्नागिरी गोळप- पावस बंदरा समोर मलपी कर्नाटक येथील परप्रांतीय नौका मासेमारी करत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने ताब्यात घेतली. या गस्ती नौकेवरील मासळी लिलाव, जबाब, पंचनामा इ. प्रक्रिया पार पाडून नौका अवरुद्ध करण्यात आली आहे.

या नौकेवरील खलाशांनी अवैध शस्त्रांचा. धाक दाखविल्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे कायदेशीर फिर्याद दाखल झाली असून, नौकेवरील ७ खलाशी पोलीस विभागकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अंतर्गत १९८१ व (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये दावा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी कस्टम विभागाने रत्नागिरी किनारपट्टी समोर सुमारे १० ते १२ सागरी मैला दरम्यान अनधिकृतपणे एलईडीलाईट्स व जनरेटर वापरात असलेली त्यांचे गस्ती दरम्यान पकडण्यात आली आहे. ही नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु आहे. ही नौका रत्नागिरी येथील महबूबखान अब्दुलाखान फडनाईक व समीरखान फडनाईक यांनीभाडे तत्वावर चालवावयास घेतल्याची प्राथमिक माहिती कस्टम विभागाने दिली आहे. ही नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात घेऊन सागरी मासेमारी नियमन अंतर्गत १९८१ व (सुधारणा) अधिनियम २०२१ अंतर्गत नौकेवर दावा दाखल करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular