29 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriभाटीमिऱ्यातील स्थानिक पारंपारिक मच्छीमार बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीबाबत आक्रमक

भाटीमिऱ्यातील स्थानिक पारंपारिक मच्छीमार बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीबाबत आक्रमक

पर्ससीन मासेमारी बंदी कालावधीत खुलेआम सुरु असलेली बेकायदा पर्ससीन मासेमारी रोखली न गेल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

जिल्ह्यात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असून, मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची मासेमारी जिल्ह्यांतर्गत केली जाते. परंतु, नवीन मासेमारी कायद्यानुसार, हा काळ पर्ससीन मासेमारी बंद ठेवण्याचा काळ आहे. सध्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्ससीन मच्छीमार या मासेमारीच्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करायला बसले आहेत.

तर काही ठिकाणी पर्ससीन बेकायदेशीर मासेमारी विरोधात नागरिक एकवटले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील भाटीमिऱ्या येथे पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमारांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांना एका निवेदनाद्वारे रत्नागिरीमध्ये बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी विरोधात तक्रार नोंदवली आहे.

सदर निवेदनामध्ये सध्या सुरु असलेल्या पर्ससीन मासेमारी बंदी कालावधीमध्ये कायद्याचे उल्लंघन करून मिरकरवाड्यातील शेकडो बोटी खुलेआम पर्ससीन मासेमारी करताना दिसत आहेत. त्यांच्यावर मासेमारी सुधारणा कायद्यान्वये मोठ्या रकमेची दंडात्मक कारवाई करून रोखली जात नाही. सध्याच्या कायद्यामध्ये दंडात्मक करण्यात आलेली तरतूद हि आधीच्या दंडापेक्षा दुप्पट तिप्पट आकारण्यात येणार  आहे.

तसेच आता या नौका एलईडी मासेमारी करणेच्या तयारीत असल्याचे निवेदनामध्ये नमूद असून ते मा‌. जिल्हाधिकारी तसेच रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. भादुले यांना देण्यात आले आहे. सदर निवेदनावर विशाल मुरकर, रणजीत भाटकर, वीरेंद्र नार्वेकर यांसह अनेक मच्छीमारांच्या सह्या असून, मासेमारी सुधारणा कायदा २०२१ मधील दंडात्मक रकमेची कारवाई करून पर्ससीन मासेमारी बंदी कालावधीत खुलेआम सुरु असलेली बेकायदा पर्ससीन मासेमारी रोखली न गेल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

स्थानिक पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमार्यांना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पर्ससीनवाले बेकायदेशीर रित्या मासेमारी करत असल्याने, पारंपारिक मच्छीमार्यांना मासळीच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular