25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeKokanमुंबई-गोवा महामार्गावर लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त

मुंबई-गोवा महामार्गावर लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त

ओसरगाव टोल नाक्यानजीक एक संशयित पांढऱ्या रंगाची महिंद्रा झायलो कार गोवा दिशेकडून येताना दिसली

गोवा राज्यातून चोरी छुप्या पद्धतीने गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असल्याने पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,  अपर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध दारू वाहतुकीवर कठोर निर्बंध आणण्याबाबत सूचना दिली होती.

मुंबई महामार्गावर ओसरगाव टोल नाक्यानजीक पांढऱ्या रंगाच्या महिद्रा झायलो कारमधून गोवा बनावटीची दारूचे ३५ बॉक्स असा एकूण ८ लाख ६९ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करून एकास अटक केली,  अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग यांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्गावर अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची पक्की खबर पोलिस अमलदार रवी इंगळे यांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार स.पो.नी. महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते. ओसरगाव टोल नाक्यानजीक एक संशयित पांढऱ्या रंगाची महिंद्रा झायलो कार गोवा दिशेकडून येताना दिसली. कार थांबवून प्राथमिक तपासणी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटीची दारू असल्याचे निष्पन्न झाले.

कणकवली पोलीस ठाण्यात गाडीची तपासणी करण्यात आली असता, मॅकडॉवेल्स कंपनीचे २८ बॉक्स व इंपिरीयल ब्लू कंपनीचे ७ बॉक्स असे एकूण ३५ दारुने भरलेल्या बाटल्यांचे बॉक्स सापडले. मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली. त्याच्या विरुद्ध दारूबंदी अधिनियमाद्वारे कारवाई करण्यात आली. ही कारवाई स.पो.नि. महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार रामचंद्र शेळके, रवी इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगावकर, प्रकाश कदम, कृष्णा केसरकर, यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular