25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeChiplunचिपळुणात शिवसेना ठाकरे गटाची न.प.वर धडक

चिपळुणात शिवसेना ठाकरे गटाची न.प.वर धडक

शिवसेना झिंदाबाद या घोषणांनी नगर परिषद आवर दुमदुमून गेला.

चिपळूण शहरातीला समस्या गणेशोत्सवापूर्वी तातडीने मार्गी लावा अशी मागणी करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शिवसैनिक नूतन शहरप्रमुख शशिकांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत नगरपरिषद कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिवसैनिकांच्या घोषणामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. चिपळूण शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शहरातील सर्व गणेश घाट विसर्जन स्वच्छ करणे, तेथे पावडर फावरणे, तेथील रस्ता स्वच्छ व्यवस्थित करणे, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शहरातील विविध ठिकाणी असणारी नगर परिषदेची सौचालय स्वच्छ करणे, तिथे पाणी ची सोय करणे, याशिवाय वाल्मिकी समाजाच्या अडचणी त्वरित सोडवणे, पाग गार्डन ला सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करणे, शहरातील खड्डे भरणे, गढूळ पाणी पुरवठा होत आहे तो सूरळीत करणे, शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अशा विविध केल्या आहेत.

त्यासाठी शिवसैनिकांनी प्रभारी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खातू यांची भेट घेऊन चर्चा केली व आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले. यावेळी शहरप्रमुख शशिकांत मोदी, महिला शहर संघटक वैशाली शिंदे, युवा शहर अधिकारी पार्थ जागुस्टे, शहर समन्वयक श्रध्या घाडगे, माजी नगरसेवक मनोज शिंदे, उपशहर प्रमुख संतोष पवार, राजू विखारे, संजय रेडीज, तेजस्विनी किंजलकर, रविषा कदम तसेच संतोष मिरगल, मयूर फटकुरे, अजय भालेकर, हर्षाली पवार, अमिता कानडे, नितेश चिपळूणकर, उदय ओतारी, परेश साळवी, मुबिन शहा, अनिल खेडेकर, संदेश किंजळकर, दत्ताराम निवते, अनामिका हरधारे, इनायत मेमन, तृप्ती कसेकर, अनंत डाफळे, अथर्व चव्हाण, विनीत शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना झिंदाबाद या घोषणांनी नगर परिषद आवर दुमदुमून गेला. यावेळी खातू यांनी सर्व कामे मार्गी लावून देतो असे सांगितले. चिपळूण शिवसेनेत प्रथमच सर्वात तरुण आणि वयाने उपस्थितांम ध्ये लहान शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. हा सन्मान उपविभाग प्रमुख मयूर फटकूरे व विभागप्रमुख हर्षाली पवार यांना मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर घोषणा देत शिवसैनिक पालिकेत दाखल झाले.

RELATED ARTICLES

Most Popular