25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल पहिला मान मुंबई- सावंतवाडीला मिळाला

कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल पहिला मान मुंबई- सावंतवाडीला मिळाला

महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे चाकरमान्यांनी यंदाही रेल्वेगाड्यांना सर्वाधिक पसंती दिली आहे.

गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशभक्तांना आतापासूनच गावचे वेध लागले आहेत. रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी ३१२ गणपती स्पेशल रेल्वे फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यात मध्य, कोकण रेल्वेच्या २५७ गणपती स्पेशल फेऱ्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेच्या ५५ फेऱ्याही गणेशभक्तांच्या दिमतीला आहेत. १३ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत नियमितपणे धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई – सावंतवाडी गणपती स्पेशलला धावण्याचा पहिला मान मिळाला आहे. महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे चाकरमान्यांनी यंदाही रेल्वेगाड्यांना सर्वाधिक पसंती दिली आहे. १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. यासाठी गावी येणाऱ्या १ लाख १० हजार चाकरमान्यांची तिकिटे कन्फर्म झाली आहेत.

हजारो गणेशभक्त अजूनही प्रतीक्षा यादीवर आहेत. याचमुळे कोकण रेल्वे मार्गावर आणखी गणपती स्पेशल गाड्या चालवण्यासाठी गणेशभक्तांकडून आग्रह धरला जात आहे. अतिरिक्त डब्यांसह अतिरिक्त थांबे जाहीर करत रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने २२२२९/ २२२३० क्रमांकाच्या सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेसचा उत्तम पर्याय गणेशभक्तांसाठी उपलब्ध आहे. आलिशान वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास महागडा असतानाही गणेशोत्सवातील १० दिवसांचे आरक्षण फुल्ल झाले असून प्रतीक्षा यादीनेही २५० चा टप्पा पार केला आहे.

प्रशासनाने जाहीर केलेल्या गणपती स्पेशल १३ सप्टेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. यातील पहिला मान ०११७१ / ०११७२ क्रमांकाच्या सीएसएमटी मुंबई- सावंतवाडी गणपती स्पेशलला मिळाला आहे. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्पेशलच्या ४० फेऱ्या धावणार आहेत. ही स्पेशल सीएसएमटी मुंबई येथून १२ सप्टेंबर रोजी रात्री १२.२० वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी २.२० वा. सावंतवाडीला पोहचेल. परतीच्या प्रवासात दुपारी ३.१० वा. सावंतवाडी येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता सीएसएमटी येथे पोहचेल.

RELATED ARTICLES

Most Popular