31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...
HomeChiplunचिपळुणात दागिने पॉलिशच्या बहाण्याने बांगड्या लांबविल्या

चिपळुणात दागिने पॉलिशच्या बहाण्याने बांगड्या लांबविल्या

महिलेच्या तोंडावर पावडर टाकून तो बांगड्या घेऊन तो पसारच झाला.

सोन्याच्या बांगड्या पॉलिश करून देतो असा बहाणा करून एकाने महिलेच्या तोंडावर पांढऱ्या रंगाची पावडर फेकून बांगड्या घेऊन पलायन केले. यामध्ये तब्बल दीड लाख रूपये किंमतीच्या अडीच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या संबंधिताने लांबविल्या आहेत. चिपळूण शहरात हा प्रकार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्ती घरी आला आणि तुमचे सोने-चांदीचे दागिने पोलिश करून देतो असे सांगितले.

तुमच्याकडे कोणते दागिने आहेत, अस विचारताच फिर्यादीने सोन्याच्या बांगड्या आहेत, असे सांगितले. सोन्याच्या यावेळी तुमच्या बांगड्या चमकावून देतो, असे सांगून बांगड्या घेतल्या. त्यावेळी महिलेच्या तोंडावर पावडर टाकून तो बांगड्या घेऊन तो पसारच झाला. आपली फसवणूक झाली हे समजताच फिर्यादीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular