दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराने सर्व गणेशचित्र शाळा उद्ध्वस्त झाल्या. गणपती कारखानदार, कारागीर यांना याचा मोठा फटका बसला. मात्र, यातून पुन्हा उभारी घेत प्रचंड इच्छाशक्ती बळावर अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया चिपळूण मुरादपूर येथील सौरभ महाजन या तरुण कलाकाराने साधली आहे. त्याने नव्या रूपात नव्या ढंगात गणेशमूर्तीचे अनोखे रूप साकारले आहे. कापडी फेटाधारी व धोती नेसवून गणपती बाप्पांना नवा साज चढवला आहे. त्रिमूर्ती गणेशचित्र शाळा या नावाने गेली कित्येक वर्षे चिपळूण मुरादपूर येथे राजू महाजन यांचा गणपती कारखाना आहे.
पीओपी व शाडूच्या मातीपासून बनवलेल्या जाणाऱ्या येथील गणेशमूर्तीना जिल्ह्यासह इतर ठिकाणी मोठी मागणी असते. आकर्षक, सुबक मूर्ती, नेत्रदीपक रंगकाम यामुळे महाजन यांच्या गणेशमूर्ती गणेशभक्तांच्या पसंतीत उतरलेल्या दिसून येतात. अशा या गणेशचित्र शाळेला चिपळुणात दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराने उद्ध्वस्त करून टाकले होते. सर्व गणेशमूर्ती पुराच्या पाण्याने वाहून गेल्या होत्या. सर्वच गणेशचित्र शाळांचे अपरिमित असे नुकसान त्या वेळी झाले होते. शासनाने केवळ ५० हजार रुपये नुकसानभरपाई देऊन या गणेशचित्र शाळामालकांची बोळवण केली होती.
मात्र, अवस्थेतही येथील गणेशचित्र शाळां आपल्या इच्छाशक्ती व कले बळावर पुन्हा एकदा उभारी घेतल्य पाहायला मिळत आहे. गणेशमूर्तिकार सौरभ महाजन गणेशभक्तांना वेगळ्या प्रकारे गणेश दिल्या पाहिजेत, अशी इच्छा बाळ त्याने जिल्ह्यात अशाप्रकारचा प्र करण्याचा निर्धार केला होता. पेण धर्तीवर मुरादपूर येथे त्याने गणपती डोक्याला आकर्षक कापडी धोती घालून गणराय साकारले अ शाडू आणि पीओपीच्या आ गणेशमूर्तीचे भव्य प्रदर्शन भरवले आहे. धोतर, फेटा करून मूर्तीमध्ये जिवंतपणा तसे हुबेहुब दिसणारे गणपती त्याने साकारले आहेत.