24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraपेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा सध्या सरकारचा विचार नाही – नवाब...

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा सध्या सरकारचा विचार नाही – नवाब मलिक

महाराष्ट्रामध्ये इंधन वाढ हि वारंवार होत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. पेट्रोल आणि डिझेलसह घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहेत. पेट्रोल डिझेलने तर आत्ता शंभरी पार केल्यामुळे महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणि या महागाईचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे.

सर्वसामान्यांची होणारी परवड आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन बुधवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करामध्ये अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कपात केली. त्याचा परिणाम म्हणून मुंबईमध्ये इंधन दर पेट्रोल ६ रुपये तर डिझेल १२ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

केंद्र सरकराने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करामध्ये अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांची कपात केल्याची घोषणा जाहीर करण्यात आल्यानंतर राज्य सरकारांनेही पेट्रोल,  डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करावी, असे आवाहन करण्यात आले होते. अनेक भाजप शासित राज्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट मध्ये कपात केली आहे. मात्र,  महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी सरकार मात्र व्हॅटमध्ये कोणतीही कपात करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने विविध राज्य सरकारांना आपल्या राज्यात इंधनावर लावलेला व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, गोवा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात,  उत्तराखंड, आसाम, मणीपूर, त्रिपुरा आणि बिहारमधील भाजपशासित सरकारांनी आपल्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला. त्यामुळे या राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी होऊन ते अधिकच स्वस्त झाले आहे. परंतु, डिलर्सचे कमिशन आणि राज्यांनी लावलेल्या व्हॅटमुळे इंधनामधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये जास्तच वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या विचारात सध्या तरी राज्य सरकार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्यामुळे  महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करणार नसल्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular