30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...

माजी मंत्री बच्चू कडूंचा निवडणूक आयोगासह ईव्हीएमवर हल्लाबोल

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू...
HomeRatnagiriवडिलांची पोटच्या ४ वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण, दुर्दैवी मृत्यू

वडिलांची पोटच्या ४ वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण, दुर्दैवी मृत्यू

पती पत्नींमध्ये कायम भांडण होत असल्याने, मुलगी पित्याजवळ जाण्यास घाबरत असे.

मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथे बापानेच आपल्या पोटच्या चिमुकलीला मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात ४ वर्षाच्या चिमुकलीला जगाचा अनुभव येण्यापूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने, गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील बाणकोट येथे ही घटना घडली. बापाने चार वर्षांच्या पोटच्या चिमुकलीला केलेल्या बेदम मारहाणीत तीचा दुर्देवी मृत्यू ओढवला. याप्रकरणी बाणकोट सागरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, बाणकोट येथील ईलीयास खेडेकर हे आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांना चार वर्षाची एक मुलगी आहे. पती पत्नींमध्ये कायम भांडण होत असल्याने, मुलगी पित्याजवळ जाण्यास घाबरत असे. पण यातून आपल्या मुलीला आपल्याबद्दल काहीच जिंव्हाळा नाही, ती कधीच माझ्या जवळ येत नाही, या सगळ्याला पत्नीच जबाबदार असल्याचे ठरवून तो पत्नीशी भांडत होता. मुलगी आपल्याला पासून मुद्दाम दूरच राहते अशी गैरसमजूत करून घेऊन खेडेकर यांनी दोन दिवसांपूर्वी या चिमुकलीला काही किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केली. यावेळी मुलीला भिंतीवर ढकलुन दिले असता तिचे डोके जोराने आपटले. यामध्ये ती जखमी झाली.

प्रथम तिला उपचारासाठी डेरवण येथे त्वरित हलविण्यात आले. परंतु, पुढील सुविधांसाठी तिला  उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु होते, मात्र  शनिवारी पहाटेच्या सुमारास तिने उपचारांना साथ देणे सोडले. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आणि त्यातच तिचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी बाणकोट सागरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular