23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeRatnagiriसातवी माळ – देवी तुळजाभवानी

सातवी माळ – देवी तुळजाभवानी

स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तुळजाभवानी आई ही कुलदेवता होय

महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी. तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान असून, हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक आदिशक्तीचे स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रमध्ये येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. भक्तांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात असते.

तुळजाभवानी देवीच्या उपासनेस शारदीय नवरात्राला अनन्यसाधारण महत्व असून या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. अश्विन प्रतिपदे पासून या शारदीय नवरात्री उत्सवास सुरुवात होते. त्यामागील पौराणिक कथेनुसार सतत नऊ दिवस महिषासुर दैत्याबरोबर चाललेल्या घनघोर युद्धानंतर, देवी थकल्याने  ती निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते. भारतीय संस्कृतीतला महत्वाचा सण दसरा हा नवरात्र संपताच दहाव्या दिवशी विजयादशमीला असतो.

स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तुळजाभवानी आई ही कुलदेवता होय. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानेच मिळाली. देवीने महाराजांना दृष्टान्त देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचा समूळ नाश करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

रत्नागिरी तालुक्यामध्ये शहरी विभागामध्ये प्रती तुळजापूर म्हणजेच तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे. शहरी भागातील बाजारपेठेमध्ये जाताना राम आळीमध्ये रामाचे भव्य मंदिर आहे. तिथे आई तुळजाभवानीची विधिवत पूजा अर्चा करून स्थानापन्न केलेली मूर्ती आहे. नवरात्री मध्ये विशेष करून महिला वर्गासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. अनेक पारंपारिक कार्यक्रम तिथे या नऊ दिवसांमध्ये पार पाडले जातात. प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी नियोजन केलेले असते, त्यामुळे महिलांचा देखील उतुस्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दर्शनासाठी इतर मंदिरांप्रमाणे शासनाचे नियम पालालेलागु असून, कोरोना निर्बधी करणाच्या नियमांचे पालन करणे अनिर्वाय केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular