25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeRatnagiriरत्नागिरीत भाजप, शिवसेनेकडून गावागावांत बैठका

रत्नागिरीत भाजप, शिवसेनेकडून गावागावांत बैठका

पावस जिल्हा परिषद गटामध्ये हालचालींना वेग आला आहे. गावागावामध्ये बैठका सुरु झाल्या आहेत.

येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावस जिल्हा परिषद गटामध्ये हालचालींना वेग आला आहे. गावागावामध्ये बैठका सुरु झाल्या आहेत. शिवसेनेकडून प्रत्येक गावामध्ये बैठकीच्या माध्यमातून विकास निधी आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपनेही प्रचार यंत्रणेला गती देण्याच्या दृष्टीने टिफिन + बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सुरू केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची मुदत संपली असून सध्या प्रशासक नेमण्यात आला आहे.

पालकमंत्री यांच्या माध्यमातून पावस जिल्हा परिषद गटांमध्ये विकासकामे सुरू आहेत. शिवसेना पावस विभागप्रमुख विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामध्ये विविध योजनेच्या माध्यमातून निधी देण्यात येत आहे. त्यामुळे. कामाच्या माध्यमातून शिवसेनेने लोकांसमोर जाण्याचे धोरण ठरवले आहे. येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये निवडणूका जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक गावांमध्ये बैठकांचे आयोजन करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावामध्ये विकासकामे देण्याचे काम हाती घेतले आहे.

गेली चार वर्षे पावस जिल्हा परिषद गटामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मरगळ निर्माण झाली होती. या गटांमध्ये भाजपचे कार्यकर्ते चांगल्याप्रकारे सक्रिय असताना माजी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या कार्यकाळात येथील संघटनेत मिरगळ आली होती. त्यामुळे या गटांमध्ये असलेल्या ग्रामपंचायती भाजपच्या हातून निसटल्या. कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाची साथ नसल्याने प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. परंतु नवीन जिल्हाध्यक्ष आल्यानंतर टिफिन बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना आता मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे.

भाजप जिल्हाध्यक्षांसमोर आव्हान – मागील जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना व भाजप हे स्वबळावर लढले होते. त्यावेळी शिवसेनेने आपले वर्चस्व निर्माण केले होते. त्यामुळे भाजपा दुसऱ्या स्थानावर राहिला होता. याचा अर्थ या गटांमध्ये भाजपाचे स्थान अद्यापही शिल्लक आहे. मात्र ते वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या चार वर्षांमध्ये या गटाकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या भागात मोठ्या पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नूतन जिल्हाध्यक्षांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

ठाकरे शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई – गेल्यावर्षी शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे पावस जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना व ठाकरे गट असे दोन गट कार्यरत आहेत. या गटांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूका या दोन गटांमध्ये थेट झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेने आपले वर्चस्व निर्माण केले होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपले अस्तित्व सिद्ध हे सातत्य ठेवण्यासाठी प्रत करण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ठाकरे गट व शिवसेना गावामध्ये ग्रामस्थांची बैठक यांच्यामध्ये थेट लढती होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular