28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...

चिपळुणात शेतकऱ्यांचे १८०० अर्ज झाले बाद

पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन...
HomeKhedएसटीच्या प्रवाशांना देखील आता करता येणार गुगल पे

एसटीच्या प्रवाशांना देखील आता करता येणार गुगल पे

या महिना अखेरपर्यंत एकाचवेळी ही सेवा महाराष्ट्रात उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

दिवसेंदिवस सर्व आर्थिक व्यवहारांचे डिजिटलायझेशन होत असून यामध्ये आता एसटीने देखील पर्दापण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना फोन पे व्दारे तिकिटाचे पैसे द्यायचे आहे, त्यांनी क्युआर कोड स्कॅन करून गुगल पे, फोन पे करता. येणार आहे. या महिना अखेरपर्यंत एकाचवेळी ही सेवा महाराष्ट्रात उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. बदलत्या काळानुसार लालपरी अर्थात एसटी महामंडळ प्रवाशांना आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. शिवशाहीनंतर इलेक्ट्रिक बसेस महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. आता संपूर्ण जग हे गुगल पे, फोन पे यावर आर्थिक व्यवहार करताना दिसत आहे.

कॅशलेस पेमेंटला अधिक महत्त्व प्राप्त होत अगदी १० रुपयाची वस्तू घेतली तरी लोक स्कॅन करून पे करतात. ही बदलती गरज लक्षात घेऊन एसटीनेही नागरिकांना कॅशलेस तिकिट पेमेंट करण्याचा निर्णय घेतला असून ऑगस्ट अखेरपर्यंत सध्या असलेल्या तिकीट मशिनमध्ये बदल करण्यात येणार आहे. क्युआरकोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे देता येणार आहे. आधी ही सिस्टीम अपडेट करून घेण्यात येणार असून त्यानंतर ही अंमलबजावणी सुरू होईल, रत्नागिरी विभागाचाही समावेश आहे. आतापर्यंत प्रवाशांना ई तिकीट दिले जात होते आता पेमेंटही ई सेवा प्रणालीव्दारे होणार आहे. गणेशोत्सवाआधी या सेवेचा शुभारंभ होण्याची शक्यता असून चाकरमान्यांना एक नवी सेवा महामंडळाकडून मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular