राज्यामध्ये असणाऱ्या सर्व लहान मोठ्या दुकानांच्या पाट्या आता स्पष्ट आणि मोठ्या अक्षरामध्ये मराठी भाषेमध्ये दिसणार आहेत. आज मंत्रीमंडळ झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत.
आज महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेठ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकानावरील पाट्या मराठीतच लावाव्या लागणार आहेत. तसेच मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्तीही मंजूर करण्यात आली.
मात्र मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी असणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील नाम फलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांपेक्षा लहान असू नये. त्याचप्रमाणे ज्या आस्थापनेमध्ये मद्य विक्री केली जाते, अशा कोणत्याही आस्थापनेला कोणत्याही महापुरुष किंवा महनीय महिला किंवा गड किल्याची नावे देण्यात येऊ नयेत असा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे.
सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात असे नियम राज्यसरकारने केले होते. मात्र काही ठिकाणी या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी दुकानांवरील पाट्या मराठी ऐवजी इंग्रजी मध्ये मोठ्या ठळक अक्षरात दिसत आहेत. त्यामुळे शासनाने या पार्श्वेभूमिवर हा निर्णय लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषेलाच काही प्रमाणात देण्यात येत असलेला दुजाभाव कमी होण्यास नक्कीच मदत होईल.