25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriलांजा शहरात डोळे येण्याची साथ सुरू, 'ड्रॉप'ची वाढली मागणी

लांजा शहरात डोळे येण्याची साथ सुरू, ‘ड्रॉप’ची वाढली मागणी

प्रभारी तालुका अधिकारी डॉ. श्री नलावडे यांनी सांगितले की, डोळे आजाराचे १० रुग्ण आढळून आले आहेत.

लांजा शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याची (कंजंक्टिव्हायटिस) साथ सुरू आहे. लांजा तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात १० रुग्ण डोळे आजाराचे आहेत. दरम्यान लांजा शहरात एक रुग्ण डेंग्यू बाधित झाला होता. आरोग्य विभागाने लांजा शहरात प्रतिबंधक उपाय योजना केल्या आहेत. तो रुग्ण बरा झाला आहे. लांजा ग्रामीण रुग्णालयात डोळे येणे, सर्दी, ताप याचे रुग्ण आढळून येत आहेत. डोळ्यांच्या औषधांची आणि ‘ड्रॉप’ची मागणी वाढली आहे. तालुक्यात डोळे येण्याचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंत त डोळ्यांची साथ प्रसरली आहे.

डोळ्यांच्या आजाराबरोबरच सध्या ताप, सर्दी, खोकला आणि ‘फ्ल’चे रुग्ण वाढले आहे. गेल्या आठवड्यापासून डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. प्रभारी तालुका अधिकारी डॉ. श्री नलावडे यांनी सांगितले की, डोळे आजाराचे १० रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय सल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे. डोळ्याला खाज येणे, डोळे सुजणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापण्यांवर सूज येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. सुरुवातीला लक्षणे दिसताच घरगुती उपाय म्हणून कोमट पाण्याने स्वच्छ कापूस ओला करून डोळे पुसावे.

डोळ्यातील इन्फेक्शन बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. सध्या, तरी रुग्ण लवकर बरे होत आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. दोन ते तीन आठवड्यात साथ कमी होईल, असा अंदाज आहे. लांजा शहरात एकाला डेंग्यूची लागण झाली होती तो रुग्ण महाविद्यालय शिक्षण रत्नागिरी घेतो लांजा शहर परिसरात डास निर्मूलन फवारणी करण्यात आली आहे. साटवली प्राथमिक आरोग्य केंद्राने, त्वरित लांजात प्रतिबंधक उपाय योजना केल्या आहेत डेंग्यूची कोणतेही साथ नसल्याचे माहिती आरोग्य अधिकारी एम. बी. आखाडे यांनी पत्रकारांना बोलताना दिली.

RELATED ARTICLES

Most Popular