27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiri'त्या' दोन दिवसांत कोरे प्रवाशांची रखडपट्टी, कोकण रेल्वे

‘त्या’ दोन दिवसांत कोरे प्रवाशांची रखडपट्टी, कोकण रेल्वे

रेल्वेच्या या कारभाराबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पनवेल-दिवा रेल्वेमार्गावर शनिवारी दुपारी मालगाडी घसरल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पुढे दोन दिवस कोलमडली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गाड्या रद्द केल्या तर काही गाड्या अन्य मार्गानि वळवल्या होत्या. काही गाड्या चिपळूण रेल्वेस्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामधील प्रवाशांचे १६ ते २९ तास हाल झाले. रेल्वेच्या या कारभाराबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. काही प्रवाशांवर ओळखीच्या लोकांशी संपर्क साधून त्या-त्या स्थानकावर जेवण किंवा खाण्याच्या वस्तू मागवण्याची वेळ आली होती.

घसरलेली मालगाडी रूळांवर आणण्यासाठी आणि ओव्हरहेड वायर दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतल्याने अप-डाऊन मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प होती. त्यामुळे कोकणात येणाऱ्या आणि येथून येणाऱ्या अनेक गाड्या ठिकठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवासी गाड्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत होते. रविवारी सायंकाळी वाहतूक सुरू झाली. त्यानंतर प्रवाशांनी धीर सोडला. रविवारी सकाळी निघालेले प्रवासी सोमवारी सकाळी दहानंतर घरी पोहोचले. यावरून गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे किती हाल झाले. असावेत, हे समजून येते.

रेल्वेने प्रवास करण्यासाठी अनेकजण सकाळपासून चिपळूण रेल्वेस्थानकावर पोहोचले होते. त्यातील काहींनी नियमित गाड्यांचे तर काहींनी जादा गाड्यांचे तिकीट घेतले होते. गाड्या रद्द झाल्यामुळे रेल्वेस्थानकावर पोहोचलेले प्रवासी पुन्हा घराकडे वळले. गाड्या रद्द केल्याचे सायंकाळपर्यंत सांगण्यात आले नव्हते. प्रवाशांना रेल्वेमार्ग सुरू होईल, रेल्वे उशिराने येईल, असे चौकशी कक्षातून सांगितले जात होते; मात्र रेल्वेमार्ग कधी सुरू होईल, रेल्वे कधी येईल हे सांगितले जात नव्हते. त्यामुळे प्रवाशांचा पारा चढला होता. काहींनी तिकिटे रद्द करून एसटीची वाट धरली तर काहींनी खासगी गाड्यांना पसंती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular