राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर या रेल्वे स्थानकांच्या परिसराचे सुशोभीकरण करणे या कामाचा लोकार्पण सोहळा आज बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी रेल्वे स्थानकात संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर या रेल्वे स्थानकाच्या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते.
पाचही रेल्वे स्थानकांच्या काम पूर्ण झाले असून आता रेल्वे स्थानकांना नवा साज चढला आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना कोकण रेल्वे परिसरात प्रसन्न वाटावे यातून कोकणात येण्याची ओढ निर्माण व्हावी या हेतूने यशस्वी करून काढण्यात आले होते. बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रत्नांगिरी रेल्वे स्थानकात लोकार्पणाचा प्रमुख सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री ना. उदय सामंत, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार भास्कर जाधव, आमदार डॉ. राजन साळवी, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तर बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोकण रेल्वे संतोष कुमार झा, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग शरद राजभोज, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला रत्नागिरी उपस्थित राहावे असे आवाहन अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपविभागीय अधिकारी (सा.बांधकाम उपविभाग) सुधीर कांबळे यांनी केले आहे.