21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurआंबा बागायतदारांचे खर्चापेक्षा उत्पन्न कमी…

आंबा बागायतदारांचे खर्चापेक्षा उत्पन्न कमी…

स्वराज्य भूमीतर्फे सलग चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरू आहे.

आंबा हंगामाच्या सुरुवातीला जास्त भाव मिळतो आणि शेवटी हजार रुपये पेटीचे मिळतात. या अडीच लाखांमधील एक लाख रुपये गुरख्याला जातात आणि दीड लाख रुपये फवारणी औषधे खते यावर खर्च होतात. ही परिस्थिती कोकणातील छोट्या हापूस आंबा बागायतदाराची आहे. जेवढा खर्च होतो त्यापेक्षा कमी उत्पन्न होते आणि कर्ज होते. औषधांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण नाही. स्वराज्य भूमीतर्फे सलग चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरू आहे. दरदिवशी वेगवेगळे शेतकरी या आंदोलनात सहभागी होतात. आपल्या व्यथा मांडतात. काल (ता.२३) या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील २० आंबा बागायतदार शेतकरी उपोषणात सहभागी झाले होते.

समृद्ध कोकण संघटनेचे संजय यादवराव यांनी त्यांच्याशी संवाद साधत आंबा बागायतदारांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यामधून नवीन विषयांना चालना मिळाली. जगातील सर्वांत प्रतिष्ठेचे फळ हापूस आंबा. अनेक सर्वसामान्य तरुण शेतकऱ्यांकडे ५०, १०० किंवा १५० हापूस आंब्याची झाडे आहेत. त्यांची सर्वांत मोठी समस्या ही माकडे आहेत. ही माकडे हापूस आंब्याची पालवी खातात, मोहर खातात आणि आंबेही खातात. त्यामुळे सहा महिने हापूस आंब्याच्या पालवीपासून मोहर, छोटा आंबा ते पिकलेला आंबा इथपर्यंत सर्वांत महत्त्वाचे माकडांपासून बागेचे रक्षण करावे लागते. त्यासाठी एका शेतकऱ्याला राखणीला गुरखा ठेवावा लागतो. या गुरख्याचा पगार सहा महिन्यांचा ७५ हजार ते एक लाख रुपये होतो.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे आंबे येणे कमी झाले त्यामुळे रक्षण करण्यासाठी पूर्वी तीन फवारण्या कराव्या लागायच्या. आता आठ ते दहा फवारण्या कराव्या लागतात. त्यासाठी भरपूर औषधे लागतात आणि त्याचा खर्च खूप होतो. मोठ्या शेतकऱ्याला पाच हजार पेटीचा भाव मिळतो त्यावेळी छोट्या शेतकऱ्यांना ३५०० मिळतात. शेवटी शेवटी या शेतकऱ्यांना एका पेटीचे एक हजार रुपये मिळतात. १०० झाडामागे अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कारण सुरुवातीला जास्त भाव मिळतो आणि शेवटी हजार रुपये पेटीचे मिळतात. या अडीच लाखांमधील एक लाख रुपये गुरख्याला जातात आणि दीड लाख रुपये फवारणी औषधे-खते यावर खर्च होतात.

… म्हणून स्थलांतर वाढतेय – आंबा बागायतीमधील मिळमारे उत्पन्न कमी होऊ लागल्यामुळे येथील तरुण आंब्याची झाडे सोडून मुंबईला दहा-वीस हजार रुपयांची नोकरी करण्यासाठी जाऊ लागला आहे. शेतकरी कर्जबाजारी होतो, कोकणात कर्ज न फेडण्याची प्रवृत्ती नाही. त्यामुळे नाइलाजाने तो आपली जमीन किंवा बाग विकतो आणि मुंबईत रवाना होतो.

RELATED ARTICLES

Most Popular