राज्यातील मत्स्य उत्पादनात यावर्षी सर्वाधिक म्हणजेच ४७ टक्के वाढ झाल्याची नोंद झाली आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटकडून ही माहिती देण्यात आली. राज्याचे मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे यांनी खात्याची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणून हे यश लाभले अशी चर्चा होऊ लागली आहे. गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच सर्वाधिक मत्स्योत्पादनाची नोंद या वर्षी झाली आहे. परप्रांतीय मासेमारी बोटींना राज्याच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी रोखण्यात आलेले यश, पर्ससीन आणि एलईडी मासेमारी रोखण्यात यश, अवैध मासेमारीवर ड्रोनने लक्ष ठेवले जात आहे, याचा परिणाम अवैध मासेमारी कमी होण्यावर झाला आहे. तसेच हवामानाने दिलेली साथ मच्छीमारांच्या पथ्यावर पडली आहे. राज्यातील मत्स्य उत्पादन ४७ टक्के वाढ महत्वाची बाब म्हणजे कोकण किनारपट्टीवरील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोकणातील मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.
या उपाययोजनांकडे ना. राणे यांनी विशेष लक्ष दिले आहेत. महाराष्ट्राचा अपवाद सन २०२४ मध्ये महाराष्ट्राचा अपवाद वगळता, पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांचे मत्स्योत्पादन घटले. कर्नाटक, गोवा, दमण आणि दिव यांचे उत्पादन घटले. दुसरीकडे पूर्व किनारपट्टीवरील राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सर्वाधिक उत्पादनवाढ नोंदवणारी राज्ये पुढीलप्रमाणे महाराष्ट्र (४७ टक्के), पश्चिम बंगाल (३५ टक्के), तमिळनाडु (२० टक्के) आणि ओडिशा (१८ टक्के) आहे. यात महाराष्ट्र पुढे आहे.
बांगड्याचेच राज्य – २०२४मध्ये मच्छिमारांच्या जाळ्यात आलेल्या मासळीत सर्वाधिक प्रमाण बांगड्याचे होते. अर्थात आदल्या वर्षीच्या तुलनेत बांगड्याचे उत्पादन घटले आहे. बांगडा : २.६३ लाख टन, तारळी : २.४१ लाख टन यांचे उत्पादन वाढले पेडवे वर्गीय, मांदेली-मोतियाळ, कुपा यांचे उत्पादन घटले बांगडा, राणीमासा, तारली, बळा, कोळंबी यांचे उत्पादन घटले आहे..