26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRajapurराजापुरात २० वर्षांनी पाणीपट्टीत वाढ

राजापुरात २० वर्षांनी पाणीपट्टीत वाढ

तब्बल २० वर्षे पाणीपट्टीत दरवाढ करण्यात आली नव्हती.

पाणीपट्टीच्या कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत पाणी व्यवस्थापनावर होणाऱ्या जादा खर्चामुळे उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ बिघडलेल्या राजापूर पालिकेने तब्बल २० वर्षांनंतर वार्षिक पाणीपट्टीच्या करात दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुतीसाठी एक हजारावरून तो १ हजार ७०० रुपये प्रस्तावित केला आहे. व्यावसायिकांसाठी २ हजार ८०० वरून ३ हजार ८०० रु., कोदवली ग्रामपंचायत हद्दीतील वार्षिक नळपाणीपट्टी १५०० वरून २२०० रु. तर धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील वार्षिक पाणीपट्टी १६०० वरून २३०० रु. प्रस्तावित करण्यात आली आहे. येथील नगर पालिकेने २००३ मध्ये घरगुती नळसंयोजनासाठी असलेली वार्षिक पाणीपट्टी ५०० वरून १ हजार रुपये केली होती.

त्यानंतर तब्बल २० वर्षे पाणीपट्टीत दरवाढ करण्यात आली नव्हती; मात्र वाढत्या महागाईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होता यावे, या दृष्टिकोनातून स्वराज्य संस्थांनी विविध कर, दर व फीमध्ये सुधारणा करावी, असे लेखी आदेश शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यामुळे तोट्यात असलेल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये घरगुती व इतर नळ संयोजनांच्या वार्षिक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आर्थिक लेखाजोखा आणि दरवर्षी होणारा लाखो रुपयांचा तोटा प्रशासन व वित्त विभागाने मुख्याधिकारी यांना सादर केला. पाणीपट्टीच्या वार्षिक करात दरवाढ करणे अनिवार्य असल्याचे सुचवले आहे.

सर्व प्रकारच्या नळ संयोजनांपासून राजापूर पालिकेला वार्षिक ३० लाख ६१ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळते. या योजनेसाठी प्रतिवर्षी होणारा खर्च ९२ लाख ४० हजार रुपये आहे. त्यामुळे पालिकेला नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी उत्पन्नापेक्षा तिप्पट जादा खर्च होत आहे. शहरात सध्या घरगुती नळ संयोजनासाठी १ हजार रुपये कर आकारण्यात येत असताना तालुक्यातील शासकीय नळयोजना कार्यान्वित असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात मात्र त्याचसाठी वार्षिक दर नमूद करण्यात आले आहेत. कोदवली १५०० रु., केळवली १७०० रु., साखरीनाटे २७००, शीळ- १५००, गोठणेदोनिवडे मुस्लिमवाडी १८००, ओणी २४००, सौंदळ मुस्लिमवाडी १४४०, सौंदळ बौद्धवाडी २५२० रुपये अशा दरांची स्पष्टता करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular