28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...

चिपळुणात शेतकऱ्यांचे १८०० अर्ज झाले बाद

पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन...
HomeRatnagiriमिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम ठप्प

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम ठप्प

पावसाळा आणि यंत्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी गेली चार ते पाच महिने बंधाऱ्याचे काम बंद आहे.

अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या मिऱ्या बंधाऱ्याचे काम सुरू झाले; परंतु यंदाचा पावसाळा, यंत्रांची देखभाल दुरुस्ती आणि निधीच्या अडचणीमुळे गेली चार महिने हे काम बंद आहे; मात्र पत्तन विभागाने संबंधित ठेकेदार कंपनीला चार दिवसांत काम सुरू करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे बंद पडलेले धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. अलावा भागाकडे मोठ्या प्रमाणात खडक असल्याने तेथे बंधाऱ्याचे काम कसे करावे, याबाबत फेर सर्व्हे करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील काम होणार आहे. पंधरामाड, मिऱ्या, भाटीमिऱ्या, अलावा भागाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा बंधारा बांधण्यात येत आहे. पक्क्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे.

मिऱ्यावासीयांनी याबाबत आंदोलन केल्यानंतर शासनाने हा बंधारा मंजूर केला. सुमारे १६० कोटी रुपयांचा हा धूपप्रतिबंधक बंधारा आहे. यासाठी मंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केले होते. तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे भूमिपूजन झाले. साडेतीन किलोमीटर लांबीचा हा बंधारा २ वर्षांत पूर्ण करायचा आहे; मात्र १० महिन्यांच्या कालावधीत अपेक्षित काम झालेले नाही. रत्नागिरीच्या पत्तन अभियंत्यांनी याबद्दल संबंधित ठेकेदारावर १८ लाख ८० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली होती. स्थानिकांची मागणी, प्रशासन, पत्तन विभागाच्या रेट्याने हे काम सुरू झाले.

मुरुगवाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या येथील टेट्रापॉड्स व ग्रोयनच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू झाले. मात्र, हे बंधाऱ्याचे काम ‘सीडब्ल्यूपीआरएस’ यांच्या मूळ आराखड्याप्रमाणे करताना दिसत नाही, खोदाई, रूंदी, उंची, तसेच योग्य वजनाचे दगड बंधाऱ्याच्या कामामध्ये वापरण्यात आलेले नाहीत, असे आक्षेप स्थानिकांनी घेतले होते. काम प्रगतिपथावर असताना एका वादामुळे हे काम बंदही पाडण्यात आले. त्यानंतर काम सुरू झाले; मात्र पावसाळा आणि यंत्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी गेली चार ते पाच महिने बंधाऱ्याचे काम बंद आहे.

अलाव्यातील खडकाचे होणार सर्वेक्षण – अलावाच्या बाजूला बंधाऱ्याचे काम करत असताना मोठ्या प्रमाणात खडक असल्याने तेथे बंधाऱ्याचे काम कसे करावे, याबाबत फेरसव्र्व्हे करण्यात येत आहे. लवकरच त्यानंतर बंधाऱ्याचे पुढील काम सुरू होईल, असे पत्तन विभागाने सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular