26.6 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriकोकण रेल्वेमार्गावर वंदे भारतच्या फेऱ्या वाढविणे अशक्य

कोकण रेल्वेमार्गावर वंदे भारतच्या फेऱ्या वाढविणे अशक्य

एक्स्प्रेसला अतिरिक्त रेक उभा करून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अशक्य आहे.

कोकण मार्गावरून धावणाऱ्या सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांच्या मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे पावसाळ्यातही आठवड्यातून ६ दिवस चालवण्यात यावी, अशी कोकण विकास समितीने मागणी केली होती. या सुपरफास्ट एक्स्प्रेसला अतिरिक्त रेक उभा करून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने फेऱ्या वाढवणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वे प्रशासनाने दिले आहे. कोकण मार्गावर धावणारी २२२२९/२२२३० क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यात ३ दिवस धावते. एक्स्प्रेस आठवड्यातून ६ दिवस चालवण्यासाठी कोकण विकास समितींने आग्रह धरत पाठपुरावाही सुरू ठेवला होता. मध्य रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य होणार नसल्याचे स्पष्ट करत एक्स्प्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर परतीच्या प्रवासात मंगळवार, व शनिवारी हे तीनच दिवस धावेल, असे स्पष्ट केले आहे.

११०९९/१११०० क्रम ांकाची एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस आठवड्यातून मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या ४ दिवस धावते. पावसाळी वेळापत्रकानुसार शुक्रवार व रविवारी तर परतीच्या प्रवासात शनिवारी व सोमवारी धावेल. २२११९/२२१२० क्रम गुरुवार ांकाची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस सोमवार आणि गुरूवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. पावसाळी वेळापत्रकानुसार मंगळवार, गुरूवार व शनिवारी तर परतीच्या प्रवासात बुधवार, शुक्रवार व रविवारी धावेल.

RELATED ARTICLES

Most Popular