26.7 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriजिंदल 'विरोधात बेमुदत धरणे आंदोलन, गॅस टर्मिनलचे काम सुरूच

जिंदल ‘विरोधात बेमुदत धरणे आंदोलन, गॅस टर्मिनलचे काम सुरूच

ग्रामस्थांचे कोणतेही म्हणणे न एकता जिंदल कंपनीतर्फे टर्मिनलचे काम सुरु आहे.

जिंदल कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील नांदिवडे येथे उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनला स्थानिकांनी तीव्र विरोध आहे. यापूर्वी वायू गळती होऊन ६८ विद्यार्थ्यांना बाधा झाली होती. त्यांना अजूनही अनेक विद्यार्थ्यांना अशा पध्दतीचा त्रास होत आहे. ग्रामस्थांचे कोणतेही म्हणणे न एकता जिंदल कंपनीतर्फे टर्मिनलचे काम सुरु आहे. कंपनीच्या या धोरणाविरुद्ध महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून जिंदल प्रकल्पाच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडे यांनी प्रांताधिकारी जीवन देसाई यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला. नांदिवडे अंबुवाडी फाटा या ठिकाणी गॅस टर्मिनल उभारण्याचे काम जिंदल उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू होणार आहे. याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी काम करीत असणाऱ्या ठेकेदार व कंपनीच्या संबंधित अधिकारी वर्गाकडून मिळाली.

१२ फेब्रुवारीला कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना गॅस टर्मिनलची जागा स्थलांतरित करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. १२ डिसेंबर २०२४ ला कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यामंदिर, जयगड येथील विद्यार्थ्यांना अचानकपणे कोणत्यातरी गॅससारख्या उग्र वायूचा वास येऊ लागला. त्याचा विद्यार्थ्यांना भारपूर त्रास झाला. डोळ्यातून पाणी येऊन श्वास घेण्याचा त्रास होउ लागला. ६४ विद्यार्थी यामुळे बाधित झाले. त्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून सुरुवातीला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. भविष्यात असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता जिंदल कंपनीतर्फे प्रकल्पाचे काम सुरू आहे. कंपनीच्या या दडपशाही धोरणाविरुद्ध सोमवारपासून जिंदल कपनीच्या गॅस टर्मिनल प्रकल्पाच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सकारात्मक प्रतिसाद नाही – विविध सरकारी कार्यालयांमध्ये या गॅस टर्मिनल प्रकल्पाच्या परवानगीबाबत कागदपत्रांची माहिती, माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये मागितलेली आहे. मात्र या सर्व अर्जाना व निवेदनांना सरकारतर्फे कोणताही सकारात्मक प्रतिसाद अद्यापी देण्यात आलेला नाही. टर्मिनलचे काम जिंदल कंपनीतर्फे वेगाने सुरू आहे. गॅस टर्मिनल हे लोकवस्तीमध्ये असल्याकारणाने वरील नमूद परिस्थितीत टर्मिनलचे बांधकाम पूर्ण झाल्यास ग्रामस्थांना अधिक त्रास सहन करावा लागणारा असल्याने ग्रुप ग्रामपंचायत, नांदिवडे यांनी या प्रकल्पास पूर्णपणे विरोध दाखवून त्याअनुषंगाने ठरावदेखील केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular