26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriऑनलाईन काम न थांबल्यास बेमुदत संप -आशा, गटप्रवर्तक कृती समिती

ऑनलाईन काम न थांबल्यास बेमुदत संप -आशा, गटप्रवर्तक कृती समिती

ऑनलाईन काम करण्यासाठी आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा फक्त १०० रुपये रिचार्ज भत्ता दिला जातो.

आशा व मोबदला दिला जात नाही. ऑनलाईन कामे करण्यासाठी होत असलेली सक्ती त्वरित थांबवावी अन्यथा १६ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा आशा, गटप्रर्वतक कर्मचारी कृती समितीने दिला आहे. मागील २ महिन्यांपासून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे राज्य अभियान संचालक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना निवेदने देण्यात आली आहेत. ऑनलाईन कामासाठी अत्याधुनिक मोबाईल व पुरेसा रिचार्ज भत्ता न देताच सक्तीने आशा व गटप्रवर्तक महिलांकडून कामे करून घेतली जात आहेत, हे अत्यंत अन्यायकारक आहे.

या कामामुळे आशा व गटप्रवर्तक महिलांना दररोज १२-१२ तास काम करावे लागते. या कारणास्तव अधिकाऱ्यांनी आशा व गटप्रवर्तक महिलांना वेठबिगारासारखे राबवून घेणे ताबडतोब थांबवावे. आरोग्य अभियानांतर्गत दोन वर्षापूर्वी आशांना मोबाईल देण्याचा निर्णय झाला आहे; परंतु अद्यापही मोबाईल मिळालेला नाही. त्यामुळे ई-कार्ड, आभाकार्ड काढणे, लाभार्थ्यांना डॉक्टरांबरोबर ऑनलाईन संपर्क करून देणे ही कामे होत नाहीत. ऑनलाईन काम करण्यासाठी आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा फक्त १०० रुपये रिचार्ज भत्ता दिला जातो.

आशा व गटप्रवर्तक महिलांना मात्र दरमहा ४०० रुपयांचा रिचार्ज मारल्याशिवाय ऑनलाईन काम करता येत नाही. ऑनलाईन काम केल्याचा पुरेसा मोबदला देण्याऐवजी एनआरएचएम महिलांकडूनच सक्तीने रक्कम वसूल करत आहे. दिवाळीपूर्वी या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस दिला जावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular