24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRatnagiriरत्नागिरी स्थानकात रेल्वेचे स्वतंत्र पोलिस ठाणे...

रत्नागिरी स्थानकात रेल्वेचे स्वतंत्र पोलिस ठाणे…

रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याचे आजच ऑनलाईन उद्घाटन झाले.

कोकण रेल्वेस्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वेस्थानकात रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याचे आजच ऑनलाईन उद्घाटन झाले. त्यामुळे येत्या काही दिवसांत रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. या रेल्वे पोलिस ठाण्यात सध्या चार पोलिस अधिकारी आणि ६० पोलिस कर्मचारी असणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेची, प्रवाशांच्या मालाची आणि रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षादलाकडे (आरपीएफ) आहे, तसेच रेल्वेस्थानके, रेल्वे परिसर, उपनगरीय मार्गावरील गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे असणार आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते पनवेल, कसारा, खोपोली आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणूरोडपर्यंतची हद्द ही मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाकडे आहे, तर रोहानंतर कोकणातील रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची, रेल्वे परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षादल आणि स्थानिक पोलिस ठाण्याची आहे; परंतु गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे.

दुचाकी चोरी, सोनसाखळी खेचणे, मारामारी, खून अशा घटना वाढल्याने या ठिकाणी रेल्वे पोलिस ठाण्याची उभारणी करणे अत्यावश्यक होते. यासह कोकण रेल्वे प्रवासात महिलांशी संबंधित गुन्हे घडत असल्याने तत्काळ गुन्हा नोंद करून तपास करणे गरजेचे असते; परंतु कोकण रेल्वे हद्दीत गुन्हा घडल्यास त्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात करावी लागत होती. त्यामुळे कोकण रेल्वेवरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाकडे दिली आहे. याबाबत शासनाकडून मान्यता मिळाली असून, आता रत्नागिरी रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिस ठाणे उभारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्वरित तक्रार करणे सोयीस्कर होईल. रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोलाड ते राजापूर रेल्वेस्थानकाचा भाग असेल तसेच, प्रत्येक स्थानकाच्या रेल्वे परिसराचाच भाग हद्दीत समाविष्ट केला आहे. त्यानंतर कोकण रेल्वेच्या स्थानकातील दोन्ही बाजूंनी ४०० ते ५०० मीटरचा भाग सोडल्यास उर्वरित भाग हा स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतच राहणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

कोलाड, विन्हेरे, रत्नागिरी, राजापूरची जबाबदारी – या पोलिस ठाण्याची हद्द ही रायगडमधील कोलाड रेल्वे स्थानक ते विन्हेरे रेल्वेस्थानक आणि रत्नागिरीमधील दिवाणखवटी रेल्वेस्थानक ते राजापूर रेल्वेस्थानकापर्यंत आहे. या ठाण्यात सुमारे १५० रेल्वे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा कार्यरत राहणार आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular