अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
आज सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ९ वाजता आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी रवाना होतील. वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर त्या संसदेकडे रवाना होतील.
अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तर कॉर्पोरेट टॅक्स कमी करत आणि त्याच्यावरील सरचार्ज कमी करून एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्य सरकारसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या मदतीसाठी केंद्राने एक लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यांना ही रक्कम दिली जाणार असून, ही रक्कम ५० वर्षांसाठी बिनव्याजी असणार आहे.
त्याचप्रमाणे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणातसदरची महत्वपूर्ण माहिती दिली आहे. नवीन आर्थिक वर्षात खरेदीसाठी पर्समध्ये कागदी नोटा घेऊन बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षात आपले डिजिटल चलन म्हणजेच डिजिटल रुपया लाँच करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिजिटल चलन सुरू करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या डिजिटायझेशनला एक प्रकारे गती मिळणार आहे.
अर्थसंकल्पामध्ये या गोष्टी झाल्या महाग
विदेशी छत्री, इमिटेशन ज्वेलरीवर प्रति किलो ४०० रुपये कस्टम ड्युटी लागणार, भांडवली वस्तूंवरील सूट संपणार, आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, ३५० हून अधिक कस्टम ड्युटी सवलती रद्द केल्या जातील, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा लाभांत मदत करण्यासाठी आणि त्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर कपातीची मर्यादा १०% वरून १४% करण्यात येईल, सरकारने आभासी चलनातून (क्रिप्टोकरन्सी) कमाईवर मोठा कर लावण्याची घोषणा केली आहे. क्रिप्टो चलन कराच्या जाळ्यात आणले जाईल आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३०टक्के कर आकारला जाईल.
अर्थसंकल्पामध्ये या गोष्टी झाल्या स्वस्त
LTCG वर १५% पेक्षा जास्त कर नाही, कापड, लेदर, परदेशातून येणाऱ्या मशिन्स, शेतीचे साहित्य, मोबाईल आणि चार्जर, जीएसटीमध्ये खूप सुधारणा होईल, केंद्राच्या बरोबरीने राज्य कर्मचाऱ्यांना NPS मध्ये सूट, कटलेले आणि पॉलिश केलेले हिरे, रत्ने यांच्यावरील सीमाशुल्क ५ टक्के करण्यात येईल, को-ऑपरेटिव्ह सरचार्ज १२ टक्क्यांवरून ७ टक्के करण्यात आला आहे.