32.4 C
Ratnagiri
Thursday, February 12, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeMaharashtra२५ दिवसानंतर आंबा समुद्रमार्गे भारतातून अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचला

२५ दिवसानंतर आंबा समुद्रमार्गे भारतातून अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचला

समुद्रमार्गे भारतातून  आंबा पाठवण्यात आला आहे. तब्बल २५ दिवसानंतर अमेरिकेच्या बाजारपेठेत तो यशस्वीरित्या पोचला.

फळांचा राजा आंबा आणि देश विदेशातून त्याला असणारी मागणी लक्षात घेता. खर्च आणि फायदा यांचा ताळमेळ साधणे गरजेचे आहे. यंदा एक नवीन पर्याय आजमावण्यात आला असून, समुद्रमार्गे भारतातून  आंबा पाठवण्यात आला आहे. तब्बल २५ दिवसानंतर अमेरिकेच्या बाजारपेठेत तो यशस्वीरित्या पोचला. कंटेनरमधील आंबा सुस्थितीत पोहोचल्याचे निदर्शनास आल्यामुळे आयातदारांसह निर्यातदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे निर्यातीवर होणार्‍या खर्चात कपात होणार असून हा खर्च किलोला एक डॉलरपर्यंत येईल. तसेच अमेरिकेच्या बाजारात आंब्याचा दरही कमी होईल, असा विश्‍वास पणन मंडळाकडून व्यक्त करण्यात आला.

भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा यांनी आंबा कंटेनरद्वारे पाठविण्याचा निर्णय घेवून सानप ग्रो निमल्स या निर्यातदाराच्या मदतीने आंबा समुद्रमार्गे पाठविण्यात आला. यामुळे अमेरिकेत आंब्याच्या निर्यातीत वाढ होणार असून आंबा कमी किंमतीत ग्राहकापर्यंत पोचेल. सध्या आंब्याचे विमान भाडे ५५० रुपये प्रतीकिलो असून तीन किलोच्या बॉक्सकरिता सुमारे २० ते २२ डॉलर आकारले जातात. हा खर्च १ डॉलर प्रती किलोपर्यंत कमी होवून निर्यातीस मोठी चालना मिळेल. तसेच अमेरिकन बाजारात भारतीय आंबा किंमतीच्या दृष्टीने इतर देशांच्या आंब्याशी स्पर्धा करू शकतो

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा यांनी आंबा कंटेनरव्दारे पाठविण्याचा निर्णय घेऊन सानप ग्रो निमल्स या निर्यातदाराच्या मदतीने आंबा समुद्रमार्गे पाठविण्यात आला. यामुळे अमेरिकेत आंब्याच्या निर्यातीत वाढ होणार असून आंबा कमी किमतीत ग्राहकापर्यंत पोहोचेल. विमान वाहतूकऐवजी समुद्रमार्गे निर्यात झाल्याने निर्यातीत वाढ होईल. हवाई वाहतुकीत होणारे नुकसान टाळण्यास मदत होऊन आंबा अधिक चांगल्या पध्दतीने आणि उत्तम स्थितीत परदेशी बाजारात पाठवला येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular