28.9 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeSportsन्यूझीलंडला धूळ चारत भारताचा रुबाबात वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश

न्यूझीलंडला धूळ चारत भारताचा रुबाबात वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश

विराट कोहलीने या शतकासह सचिन तेंडुलकरच्या वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला.

वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझिलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात रुबाबत प्रवेश केला आहे. किवींनी दिलेल्या चिवट झुंजीमुळे सामना अधिक रोमांचक झाला होता. मात्र, आता न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करून टीम इंडियाने फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री केली आहे. डॅरिल मिशेल याच्या वादळी शतकामुळे टीम इंडिया अडचणीत आली होती. मात्र, मोहम्मद – शमीने ७ विकेट घेत न्यूझीलंडला वर्ल्ड कपमधील प्रवास थांबवला आहे. कॅप्टन कुल केन विलियम्सनने मिशेलला मोलाची साथ दिली होती. मात्र, शमीच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपळले अन् टीम इंडियाने सेमीफायनलमधील पराभवाचा बदला घेतला आहे.

त्यामुळे आता भारतीय संघाने फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली आहे. टीम इंडियाने दिलेल्या ३९८ धावांचं आव्हान पूर्ण करताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र या दोन्ही सलामीवीरांना शमीने तंबूत पाठवलं. त्यानंतर मात्र, पारडं पलटलं. कॅप्टन केन आणि डॅरिल मिशेल यांनी संयमी आणि चिवट खेळी केली. २ बाद ३९ वरुन २२० वर २ गडी बाद, अशी परिस्थिती न्यूझीलंडची होती. त्यामुळे रोहित शर्मा टेन्शनमध्ये आला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून रोहितने पुन्हा आपल्या स्टार बॉलरच्या हातात बॉल सोपवला अन् शमीने देखील कॅप्टनला निराश केलं नाही.

शमीने ३३ व्या ओव्हरमध्ये केन विलियम्सन आणि टॉम लेथम यांना माघारी पाठवलं. त्यानंतर भारतीयांनी सुटकेचा श्वास घेतला. ग्लेन फिलिप्स भारी पडत असताना बुमराहने त्याचा पत्ता कट केला. तर शमीने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकत शतक ठोकून मैदानात झुंजत असलेल्या डॅरिल मिशेल याला बाद केलं. त्यानंतर भारताने आरामात सामना खिशात घातलाय. वर्ल्ड कपचा दुसरा सेमीफायनल सामना गुरुवारी १६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. साऊथ अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवला जाईल. या दोन्ही संघातील विजयी टीम १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात फायनलमध्ये टीम इंडियाशी दोन हात करणार आहे.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकाच्या बळावर भारताने उपांत्य सामन्यात ३९७ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीने ११३ चेंडूत ११७ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने ७० चेंडूत १०५ धावांचा पाऊस पाडला. त्याशिवाय शुभमन गिल यानेही अर्धशतक ठोकले. अखेरच्या दहा षटकात भारताने ११० धावांचा पाऊस पाडला. विराट, राहुल आणि श्रेयस यांनी न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढली. न्यूझीलंडला विजयासाठी ३९८ धावांचा पाठलाग करायचाय. विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग झालेला नाही.

विराट कोहलीचे ५० वे शतक – रोहित शर्माने दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर विराट कोहलीने भारताची धावसंख्या वाढवली. सुरुवातीला एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. विराट कोहलीने शुभमन गिल याच्यासोबत आधी मोठी भागिदारी केली. गिल क्रॅम्प आल्यामुळे मैदानाबाहेर गेला. पण त्यानंतर विराट कोहर श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने शुभमन गिल याच्यासोबत ९३ धावांची भागिदारी केली. त्यानंतर अय्यरसोबत त्याने १२८ चेंडूत झटपट १६३ धावांची भागिदारी केली. विराट कोहली आणि अय्यर यांनी भारताची धावगती वाढण्याचे काम केले. विराट कोहलीने ११३ चेंडूत ११७ धावांची जिगरबाज खेळी केली. यामध्ये २ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश आहे. विराट कोहलीने या शतकासह सचिन तेंडुलकरच्या वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला.

अय्यरचे दुसरे शतक – श्रेयस अय्यरने यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक झळकावले. अय्यरने पहिल्या चेंडूपासूनच हल्लाबोल केला. अय्यरने विराट कोहलीसोबत १६३ धावांची शानदार भागिदारी केली. त्यानंतर अखेरीस केएल राहुलसोबत वेगाने धावसंख्या वाढवली. अय्यर आणि केएल राहुल यांच्यामध्ये २९ चेंडूमध्ये ५४ धावांची महत्वाची भागिदारी झाली. अय्यरने अवघ्या ७० चेंड्रम ध्ये १०५ धावांची विस्फोटक खेळी केली. यामध्ये तब्बल आठ षटकारांचा समावेश होता. अय्यरने चार चौकारही लगावले.

रोहितची वादळी सुरुवात – नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मानि नेहमीप्रमाणेच चौकार आणि षटकारांची बरसात केली. रोहित शमनि शुभमन गिलच्या साथीने भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. रोहित शर्मा ४७ धावा काढून बाद झाला. पण त्याने त्याचं काम चोख बजावले होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी ८.२ षटकात ७१ धावांची भागिदारी केली. रोहित ‘शर्माने २९ चेंडूमध्ये चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४७ धावांचं योगदान दिले.

शुभमन गिलचा तडाखा – सलामी फलंदाज शुभमन गिल यानेही पुन्हा एकदा वादळी फलंदाजी केली. रोहितची फटकेबाजी सुरु असताना दुसऱ्या बाजूला शातंते खेळणाऱ्या गिलने अप्रतिम फटकेबाजी केली. शुभमन गिल याने ८० धावांचे योगदान दिले. क्रॅम्प यामुळे शुभमन गिल याला मैदान सोडा लागले होते. शुभमन गिल याने विराट कोहलीसोबत ९३ धावांची भागिदारी केली. शुभमन गिलने ६६ चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या. अखेरच्या षटकात शुभमन गिल पुन्हा मैदानात आला होता.

राहुलचा फिनिशिंग टच – विराट बाद झाल्यानंतर केएल राहुलने श्रेयस अय्यरला चांगली साथ दिली. अय्यरसोबत त्याने अर्धशतकी भागिदारी केली. राहुलने अखेरीस २० चेंडूमध्ये ३९ धावा झोडपल्या. त्याने दोन षटकार आणि पाच चौकारांचा पाऊस पाडला. सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात फक्त एक धाव काढून सूर्यकुमार यादव बाद झाला.

न्यूझीलंडची धुलाई – रोहित, गिल, विराट आणि अय्यरने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडली. ट्रेंट बोल्ट याला १० षटकात ८६ धावा चोपल्या. त्याला फक्त एक विकेट मिळाली. लॉकी फर्गुसन याला ८ षटकात ६५ धावा निघाल्या. मिचेल सँटनर याला १० षटकात ५१ धावा दिल्या. ग्लेन फिलिप्सला पाच षटकात ३३ धावा निघाल्या. रचिन
रविंद्रला सात षटकात ६० धावा चोपल्या. टीम साऊदी याने आपल्या दहा षटकात तब्बल १०० धावा खर्च केल्या. त्याला तीन विकेट मिळाल्या, पण तो खूपच महागडा ठरला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीचा अपवाद वगळता न्यूझीलंडची गोलंदाजी फिकी दिसली.

RELATED ARTICLES

Most Popular