टी -20 विश्वचषकाच्या सुपर -12 फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव करून इतिहास रचला आहे. विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवानच्या शानदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारताला लाजिरवाणा पराभव दिला.
दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 151 धावा केल्या होत्या, भारतीय संघाची फलंदाजी पूर्ण अपयशी ठरली. केवळ विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 68, मोहम्मद रिझवानने 79 धावा केल्या.
टी -20 विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला पराभव
टी -20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. दुबईत रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. अन्यथा, भारताने 2007 ते 2016 पर्यंत टी -20 विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तानला नेहमीच पराभूत केले आहे.
टी -20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना
- 2007- भारताने पाकिस्तानचा पराभव केला (बॉल आऊट)
- 2007 – भारताने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला (अंतिम)
- 2012 – भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला (कोलंबो)
- 2014 – भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला (ढाका)
- 2016- भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला (कोलकाता)
- 2021- पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला (दुबई)