27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSportsभारत-श्रीलंका एक दिवसीय मालिकेची तारीख निश्चित | १८ जुलैला पहिला सामना

भारत-श्रीलंका एक दिवसीय मालिकेची तारीख निश्चित | १८ जुलैला पहिला सामना

भारत व श्रीलंका यांच्यामधील एक दिवसीय क्रिकेट मालिकेची तारीख निश्चित झाली आहे. भारत श्रीलंका एक दिवसीय मालिकेचा पहिला सामना १८ जुलै खेळवला जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना १८ जुलै, दुसरा सामना २० जुलै आणि शेवटचा तिसरा सामना २३ जुलैला खेळला जाईल.

भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी शनिवारी याची पुष्टी केली की श्रीलंका आणि भारत यामध्ये होणाऱ्या एक दिवसीय मालिकेची सुरुवात १८ जुलैला होईल. पहिली या मालिकेची सुरुवात कोलोम्बो मध्ये १३ जुलैला होणार होती, पण याची याची तारीख आता पुढे केली गेली आहे. श्रीलंकाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर हे गुरुवारी कोरोना पोझिटीव्ह सापडले, त्यानंतर संघाच्या सगळ्या सदस्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली गेली. शुक्रवारी चाचणी आल्या नंतर असे समजले की ग्रँड फ्लॉवर, विडिओ एनालीस्ट जी टी निरोशन कोरोनाच्या संपर्कात आले होते.

india shrilanka ODI in july

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सगळ्या खेळाडूंनी कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्याची माहिती दिली आहे. परंतु खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता एक दिवसीय मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला. मालिकेच्या तारखानबद्दलचा निर्णय श्रीलंका संघामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केला गेला. भारत-श्रीलंका मध्ये तीन सामानाची एक दिवसीय मालिका १३ जुलै ला सुरू होणार होती, पण आता ती १८ जुलैला सुरू होइल. श्रीलंका क्रिकेट बोर्डला वाटत की खेळाडूच्या सुरक्षेसाठी अजून काही दिवस खेळाडूंनी कॉरंटीनमध्ये राहावे. याआधी सौरभ गांगुलीने एएनआई शी बोलताना सांगितले की श्रीलंका संघामध्ये कोरोनाचे लक्षणे दिसून आल्यामुळे भारत श्रीलंका यांच्यामधील एकदिवसीय मालिका १७ जुलै परेंत स्थगित केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular