28.4 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeSportsआशियाई स्पर्धेत भारताच्या नेमबाजांचा जलवा

आशियाई स्पर्धेत भारताच्या नेमबाजांचा जलवा

१७ वर्षीय पलकने पटकावलं गोल्ड, तर ईशाने जिंकलं चौथं पदक.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नेमबाजांची पदकांची कामे सुरूच आहे. तिन्ही पदकांची एकामागून एक पदके पटकावत आहेत. आजही भारताच्या नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदकांनी प्रारंभ केला. पलक गुलिया आणि ईशा सिंग यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. दोघांनीही एकमेकांना कडवे आव्हान देत अव्वल दोन स्थान पटकावले. १७ वर्षीय पलकने सुवर्णपदकं तर ईशाने रौप्य पदक जिंकले. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने नेमबाजीत सहा- सुवर्णांसह एकूण १७ पदके जिंकली आहेत.

पाकिस्तानच्या तलत किश्मलाला कांस्यपदक मिळाले. पलकचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिले वैयक्तिक पदक आहे. तिने अंतिम फेरीत २४२.१ स्कोअर केला. ही संख्या आशियाई खेळातील एक विक्रम आहे. बुधवारी २५ मीटर पिस्तलमध्ये वैयक्तिक रौप्यपदक जिंकणारी ईशा १० मीटर एअर पिस्तुलमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या संघाचाही भाग होती. ईशाने वैयक्तिक अंतिम फेरीत २३९.७ स्कोअर केला. भारतान पुरुषाच्या , ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये विश्वविक्रम सह सुवर्णपदक जिंकले. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर (५९१), स्वप्नील कुसळे (५९१) आणि अखिल शेओरन (५८७) या संघात होते ज्यांनी चीनच्या आव्हानावर मात करत १७६९ स्कोअर केला.

चीन १७६३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर तर दक्षिण कोरियाला कांस्यपदक मिळाले. ऐश्वर्य आणि स्वप्नील यांनीही पात्रता फेरीत प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवून वैयक्तिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाचव्या स्थानावर असूनही, अखिल हा अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही कारण एका देशातून फक्त दोन स्पर्धक आठ संघांच्या अंतिम फेरीत भाग घेऊ शकतात. पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा असलेल्या स्वप्नीलने पात्रता फेरीत ५९१स्कोअर करत आशियाई विक्रम मोडीत काढला. ऐश्वर्यनेही समान स्कोअर केला होता पण स्वप्नीलने अधिक इनर १० मारल्यामुळे अव्वल राहिला.

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात १८ वर्षीय ईशा (५७९), पलक (५७७) आणि दिव्या टीएस (५७५) यांचा एकूण १७३१ स्कोअर होता. चीनने १७३६ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले, हा देखील आशियाई क्रीडा स्पर्धेतील विक्रम आहे. चायनीज तैपेईला कांस्यपदक मिळाले. ईशाने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले आहे. तर ईशा, मनूक्री भाकर आणि रिदम संगवान यांनी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular