आजकाल दुचाकी आणि सोबतच चारचाकी वाहन चालवणे मुलभूत गरजांपैकी एक बनलं आहे. गाडी चालवणे ही एक प्रकारची कला आहे. त्यामुळे त्यातील अगदी बारीक सारीक बारकावे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. उत्कृष्ट, मोकळ्या, लांबच्या लांब रिकाम्या रस्त्यांवर वाहन चालवायची मजा काही औरच!
भारतातील आणि विदेशातील रस्त्यांमधील फरक नक्कीच जाणवण्यासारखा आहे. विदेशात वाहन चालवण्याचा अनुभव देखील नक्कीच अविस्मरणीय आनंद देणारा ठरू शकतो. देश कोणताही असो, भारत असो वा जगाच्या पाठीवरील इतर कुठलाही देश, गाडी चालवण्यासाठी तुमच्याकडे अधिकृत वाहन परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स असणे अतिशय गरजेच आहे. ज्या देशाचे नागरिक त्या देशाचे लायसन्स स्वत:कडे बाळगणे गरजेचे आहे. जर भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही ते विदेशात वापर करून वाहन चालवू शकता का? तुम्ही इतर कोणत्या देशांत भारतीय लायसन्स सह ड्रायव्हिंग करू शकता, हे जाणून घेऊया.
जर्मनी – जर तुम्ही जर्मनीमध्ये फिरण्यासाठी जाणार असाल तर, तुम्हाला तिथे गाडी चालवायची असेल तर भारतीय लायसन्स वापरून ६ महिने पर्यंत गाडी चालवू शकता.
अमेरिका – अमेरिकेमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे तुम्ही १ वर्ष वाहन चालवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे वैध आणि इंग्रजी भाषेमधील लायसन्स असणे महत्त्वाचं आहे.
स्वित्झर्लंड – जगातील आकर्षक आणि सुंदर ठिकाणांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडमध्येही, तुम्हाला भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वापरून वाहन चालवण्याची परवानगी आहे.
दक्षिण आफ्रिका – तुमचं भारतीय लायसन्स इंग्रजी भाषेतून बनलेलं असेल तर तुम्ही दक्षिण आफ्रिकेतही वाहन चालवू शकता. केवळ तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर तुमची सही आणि फोटो व्यवस्थित दिसणे बंधनकारक आहे.
न्यूझीलंड – वयाची २१ वर्षे पूर्ण असतील तर न्युझीलंडमध्ये देखील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास तुम्ही वाहन चालवू शकता.
ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलिया मध्येही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह तुम्हाला वाहन चालवण्याची मान्यता आहे.
नॉर्वे – सौंदर्याची खाण असेलेला युरोपीय बेटांपैकी एक नॉर्वे. नॉर्वेमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स आधारे ३ महिनेपर्यंत गाडी चालवू शकता.