24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeSportsपारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव - रोहित शर्मा

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

अॅडलेड येथील कसोटी सामना भारताने अडीच दिवसांच्या आतच गमावला.

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीचा रंग फिका पडल्यानंतर भारतीयांनी आता पुढच्या कसोटीसाठी पारंपरिक लाल रंगाच्या चेंडूवर सराव सुरू केला. यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आघाडीवर होते. अॅडलेड येथील कसोटी सामना भारताने अडीच दिवसांच्या आतच गमावला. त्यामुळे आता लगेचच नेट सराव सुरू करण्याशिवाय पर्याय नसलेल्या भारतीयांनी हॉटेल रूममध्ये वेळ न घालवता मैदानावर घाम गाळण्यास सुरुवात केली. अनेकदा ऑप्शन प्रॅक्टिस (सर्वांना अनिवार्य नसलेला) असताना बहुतांशी खेळाडू हॉटेल रूममध्ये आराम करणे पसंत करतात अशी टीका अॅडलेड येथील सामना गमावल्यानंतर सुनील गावसकर यांची केली होती.

गावसकर-बॉर्डर मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनला रवाना झाला, परंतु भारतीय संघ अॅडलेडमध्येच असून, लाल चेंडूवरील सरावास झोकून दिले आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या सरावाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यात सर्व फलंदाज बचाव करताना आणि उजव्या यष्टीबाहेरचे चेंडू सोडून देताना दिसून आले. आता पुढे जाण्याची वेळ आहे, अॅडलेडमध्ये आम्ही ब्रिस्बेन कसोटीची तयारी सुरू केली आहे, असाही संदेष बीसीसीआयने आपल्या व्हिडिओमध्ये नमूद केला आहे.

रोहित शर्मावर दडपण – अॅडलेडमधील भारतीय फलंदाजीची झालेली दारुण अवस्था आणि त्याला कर्णधार रोहित शर्माचे अपयश यालाही जबाबदार धरण्यात आले. गेल्या १२ कसोटी डावांत मिळून त्याला अवघ्या १४२ धावांच करता आलेल्या आहेत. त्यात (५२) या एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. रोहित पुत्ररत्न झाल्यामुळे पहिल्या कसोटीत खेळला नव्हता. पहिल्या कसोटीत यशस्वी जयस्वाल आणि के. एल. राहुल ही सलामीची जोडी दुसऱ्या डावात यशस्वी ठरल्यामुळे त्यात बदल करण्यात आला नाही. परिणामी, रोहितने सलामीऐवजी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्याला तीन आणि सहा धावाच करता आल्या होत्या. पहिल्या डावात तो इनस्विंग झालेल्या चेंडूवर पायचीत, तर दुसऱ्या डावात त्रिफाळाचीत झाला होता. विराट कोहलीने पर्थ येथील पहिल्या कसोटीत शतक करून १६ महिन्यांची प्रतीक्षा संपवली होती; पण उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूवर बाद होण्याचे त्याचे अपयश कायम राहिले. दुसऱ्या कसोटीत तो अशाच चेंडूंवर बाद झाला. या अपयशावर मात करण्यासाठी विराट आज सरावात प्रत्येक चेंडू सावधपणे खेळत होता. राहुलने आजच्या सरावात बचावात्मक फलंदाजीवर अधिक भर दिला, तर रिषभ पंत काही चेंडू जोरात मारताना दिसून आला. पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात १६१ धावांची शानदार खेळी करणारा यशस्वी जयस्वाल काही वेगळे फटके मारण्याचा सराव करत होता. काही चेंडूंवर तो पुढे सरसावत प्रहार करत होता.

RELATED ARTICLES

Most Popular