24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriउद्योगमंत्री सामंतच आम्हाला न्याय देतील - जे. के. फाईल्स कर्मचारी

उद्योगमंत्री सामंतच आम्हाला न्याय देतील – जे. के. फाईल्स कर्मचारी

शेकडो कामगारांचा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरच असून, तेच आम्हाला न्याय मिळवून देतील आणि तेच आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचे पत्रक कामगारांनी काढले आहे.

जे. के. फाईल्स कामगारांच्यामागे उद्योगमंत्री उदय सामंत ठाम उभे असल्याचा विश्वास कामगारांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्रीच आम्हाला न्याय देतील, असे पत्रही कामगारांनी काढले आहे. त्यामुळे गैरसमज पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन कामगारांनी या पत्राद्वारे का केले आहे. येथील जे. के. फाईल कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेकडो कामगारांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी कामगारांच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

आमच्या शेकडो कामगारांचा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरच असून, तेच आम्हाला न्याय मिळवून देतील आणि तेच आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचे पत्रक कामगारांनी काढले आहे. कामगारांच्या नावाने कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी अफवा पसरवल्या जात असल्यामुळे जे. के. फाईलच्या कामगारांनी एकत्र येत निषेध केला आहे. रत्नागिरीचे उदय सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री आहेत. त्यामुळे शेकडो लोकांच्या कुटुंबांना ते उघड्यावर सोडणार नाहीत, असा विश्वास कामगारांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular