राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.४५ वाजता हेलिकॉप्टरने पुणे येथून रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व राखीव. सायंकाळी ४.०० वाजता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी तर्फे सत्कार समारंभास उपस्थिती. (स्थळ : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रत्नागिरी) सायंकाळी ४.४५ वाजता जिल्हा परिषद वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ उद्घाटन सोहळा तसेच जिल्हा परिषद मुख्यालय व जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभास उपस्थिती. (स्थळ : शामराव पेजे सभागृह, जि.प. आवार, रत्नागिरी) सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी येथून मोटारीने चिपळूणकडे प्रयाण.
सायंकाळी ७.०० वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष १२५ निमित्त “किर्तन सोहळा” कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र समोरील पटांगण, चिपळूण जि. रत्नागिरी). सायंकाळी ७.४५ वाजता चिपळूण येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. रात्रौ ९.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.