28.9 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriकोकणात भरभराटीसाठी उद्योगाची पावले…

कोकणात भरभराटीसाठी उद्योगाची पावले…

रत्नभूमीतून कोकणातील विकास सुरू करणार असून या निमित्ताने आधुनिकतेची कास धरत आहोत. 

यापूर्वीच्या सरकारमुळे कोकणात कोका-कोला प्रकल्प उशिरा येत आहे. आमचे सरकार येताच आम्ही राज्यातील जनतेसाठी विकासाची दारे उघडली आहेत. यापुढे ग्रीनफिल्ड हायवे व कोकण विकास प्राधिकरण निर्मितीला गती देणार आहे. आर्थिक भरभराटीसाठी उद्योगाची पावले कोकणात पडावीत, वाढावीत, अशी सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोटे येथे केले. हिंदुस्थान कोका-कोला बेवरेज कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन लोटे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते म्हणाले, पर्यावरण संतुलन राखत औद्योगिकीकरण महत्वाचे आहे. रत्नभूमीतून कोकणातील विकास सुरू करणार असून या निमित्ताने आधुनिकतेची कास धरत आहोत.

कोका-कोला कंपनीचे मी स्वागत करतो. या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार देण्याची सरकारची भूमिका आहे. कंपनीदेखील स्थानिकांना प्राधान्य देईल. आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा व आनंदाचा आहे. केवळ निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि प्रकल्पांना विरोध करायला आम्हाला बाळासाहेब किंवा दिघेसाहेब यांनी शिकवलेले नाही. महाराष्ट्रात उद्योग, व्यापार, गुंतवणूक संस्था सुरू करून आपण विकास प्रकल्पांना गती दिली आहे. हा प्रकल्प आशियातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. कोकणाला विकासाकडे नेण्यासाठी पायाभूत सुविधा व उद्योगनिर्मिती करावी लागेल. उद्योग उभे राहतील, यासाठी. आम्ही अनेक सुविधा कारखानदारांना देत आहोत. आम्ही तयार केलेल्या उद्योग धोरणाचा ८० टक्के अवलंब करण्यात आला आहे.

औद्योगिक विकासासोबतच समुद्रकिनारी पर्यटन विकासासाठी प्रयत्न करू. कोकण विकास प्राधिकरणाच्या मि माध्यमातून ६७ टीएमसी पाणी कोकणात खेळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोका-कोलाने जास्तीत जास्त कोकणात गुंतवणूक करावी. त्यांना लागेल ते सहकार्य राज्य सरकार करणार आहे. दरम्यान, राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जसे केंद्र सरकार शेतकऱ्याला बँक खात्यात ६ हजार देत आहे तसे राज्य सरकारदेखील ६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular