27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeChiplunसेवानिवृत्त शिक्षिकेच्या अमानूष खुनाने चिपळूण हादरले

सेवानिवृत्त शिक्षिकेच्या अमानूष खुनाने चिपळूण हादरले

तात्काळ श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

सेवानिवृत्त शिक्षिकेच्या अमानूष खुनाने चिपळूण हादरले. सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती वर्षा वासुदेव जोशी या ६३ वर्षीय विधवा महिलेचा मृतदेह विवस्त्र आणि पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या घर गुरुवारी सकाळी धामणवणे खोतवाडी चिपळूण येथे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली. तात्काळ श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने मृतदेहाजवळून थेट डोंगरावरील एका फार्महाऊसपर्यंत धाव घेतली, त्यामुळे मारेकरी जंगलाच्या दिशेने पळाल्याचा अंदाज असून हा खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले असून या प्रकरणी एका जवळच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात देखील घेण्यात आले आहे. हा खून कोणी आणि कशासाठी केला याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.

घरात एकट्याच होत्या – या श्रीमती वर्षा जोशी जिल्हापरिषदेच्या शाळेत शिक्षिकां होत्या. पती वासुदेव जोशी यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. तर वर्षा जोशी या ६ वर्षांपूर्वी सेवनिवृत्त झाल्या होत्या. त्यामुळे त्या धामणवणे खोतवाडी येथील आपल्या घरी एकट्याच राहत होत्या. गुरुवारी त्या आपल्या मैत्रीणीबरोबर हैद्राबाद, विठापूर येथे ट्रिपसाठी जाणार होत्या. त्यासाठी त्यांनी सर्व तयारीदेखील केली होती. बुधवारपर्यंत त्या सर्वांच्या संपर्कात होत्या. परंतु बुधवारी रात्रीनंतर त्यांच्या मोबाईलवर फक्त रिंग जात होती. मात्र असे काही घडेल हे त्यांच्या मैत्रणीच्याही ध्यानीमनी नव्हते.

शेजाऱ्यांना फोन व संपर्क – बुधवारी रात्री वर्षा जोशी यांना त्यांच्या मैत्रीण तोरस्कर या सतत फोन करत होत्या, परंतु कोणताच रिस्पॉन्स मिळत नव्हता. अखेर त्यांनी वर्षा जोशी यांचे शेजारी श्री. चौधरी यांना फोन केला व माहिती घेण्यास सांगितले, परंतु त्यांचा दर्शनी दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे संशय बळावला आणि शेजारी तसेच येथील सरपंच यांनी मागील दरवाजा बघितला असता तो उघडा होता. शेजारी घरात जाताच हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

पाय बांधलेला विवस्त्र मृतदेह – जोशी यांच्या घराच्या बेडरूममध्ये पाय बांधलेला विवस्त्र अवस्थेत वर्षा जोशी यांचा मृतदेह आढळून आला. तर मोबाईल पाण्याच्या बादलीत फेकलेला होता. घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते. हा प्रकार उघडकीस येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. डीवायएसपी राजमाने तसेच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ दाखल झाले आणि वेळ न घालवता त्यांनी पाहणी करून तपासाची पुढील चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षकांना देखील घटनेची कल्पना देण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला.

ठसेतज्ज्ञ व श्वानपथक दाखल – घटनेचे गांभीर्य पाहता तात्काळ ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. रेनबो श्वान मृतदेहाजवळ काही काळ थांबला आणि घराच्या मागच्या दरवाज्यातून थेट धामणवणे येथील डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. येथील एका फार्महाऊसमध्ये श्वान घुसला. तेथून जवळच असलेल्या पाण्याच्या वहाळाकडे झेपावले व मागे फिरले. त्यामुळे मारेकरी त्या दिशेने पसार झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून हा खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. लगेच ठसेतज्ज्ञांनी देखील आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

सीसीटीव्हीचे व्हीडीआर पळवले?- तपासला गती देताना पोलिसांनी सर्वप्रथम येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली, मात्र जोशी यांच्या घराजवळील सीसीटीव्हीचे व्हीडीआर गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे मारेकरी माहितगार असून त्यानेच मुख्य व्हीडीआर पळवला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. तसेच आजूबाजूचे सीसीटीव्हीदेखील पोलिसांनी तपासले, परंतु एक बंद असून दुसरा सीसीटीव्ही भुरकट असल्याचे निदर्शनास आले, परंतु पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

चौकशीसाठी एकजण ताब्यात ? – पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आपला अनुभव पणाला लावत परिस्थितीजन्य माहिती आणि अंदाज बांधत तातडीने चौकशी सुरू केली आणि एका जवळच्या माणसाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे. परंतु यासंदर्भात पोलिसांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र तपास गतीने सुरू करण्यात आला असून पोलीस अधीक्षक स्वतः चिपळूणमध्ये येणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular