23.9 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

चिपळूण बसस्थानकासाठी उपाययोजना करा – आमदार शेखर निकम

चिपळूण येथील हायटेक बसस्थानकाचे काम गेल्या ६...
HomeRatnagiriरत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

गडाचा ऐतिहासिक वारसा व नियमांचे महत्त्व पटवून देणारे सूचनाफलक लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आले. रत्नदुर्ग किल्ल्यावर होत आसलेली अश्लील कृत्ये, मद्यपान व प्रेमीयुगुलांच्या रात्री-अपरात्रीच्या फेऱ्या थांबविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गडसंवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आणि सविस्तर चर्चेसाठी लवकरच पुन्हा बैठक घेऊ, असे सांगितले. रत्नदुर्ग किल्ल्याच्या पवित्र वास्तूत होत असलेल्या अश्लील व व्यसनाधीन प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी नियमित पोलिस गस्त व कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. रात्री-अपरात्री किल्ल्यावर होणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या फेऱ्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. गडकिल्ल्याच्या परिसरात गडाचा ऐतिहासिक वारसा व नियमांचे महत्त्व पटवून देणारे सूचनाफलक लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

झाडेझुडपांमुळे बुरूज व ऐतिहासिक वास्तूंना होणारे नुकसान रोखण्यासाठी नियमित स्वच्छता व संवर्धनाचे उपक्रम राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. या बैठकीला गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष दीपेश वारंग, महिलाध्यक्ष मानसी चव्हाण, संपर्कप्रमुख तन्मय जाधव, गडकिल्ले सेवक दीपक रेवाले, राजा कीर, विजय कळंबटे, सचिन कळंबटे, कीर्ती धामणे, शीतल श्रीखंडे, दीपक कडोलकर, शुभांगिनी जाधव, शशिकांत जाधव, स्वयम नायर, शिवसेना शिंदेगट महिला जिल्हा संघटक संध्या कोसुंबकर यांसह अनेक गावकरी व संघटनांचे सदस्य उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जयदीप साळवी, धर्मजागरण दक्षिण रत्नागिरी संयोजक विजय यादव, हिंदू महासभेचे अध्यक्ष श्रीकांत मराठे आदींनी या कार्यास पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.

आंदोलनाचा इशारा – रत्नदुर्ग किल्ला संवर्धनाबाबत संस्थेचे संस्थापक योगेश सोनवणे यांनी कडक इशारा दिला की, या विषयावर योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून जनआंदोलन उभे केले जाईल. ही बैठक रत्नदुर्ग किल्ल्याच्या पवित्र वास्तूच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, यासाठी लवकरच अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular